नुकसान भरपाईच्या मागणीसाठी शेतकरी करणार उपोषण

लोणी, धामणी, शिरदाळे व पहाडदरा परिसरात गेल्या आठ दिवसांत अतिवृष्टी झाल्यामुळे बटाटा, सोयाबीन, वाटाणा, बाजरी, भुईमूग ही पिके १०० टक्के वाया जाण्याच्या मार्गावर आहेत.
Crop Damage
Crop DamageAgrowon

पारगाव, ता. आंबेगाव ः तालुक्याच्या पूर्व भागातील लोणी, धामणी, शिरदाळे व पहाडदरा या परिसरात मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान (Crop Damage Due To Heavy Rain) झाले असून, शासनाने या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई (Compensation) द्यावी, या मागणीसाठी या भागातील लोकप्रतिनिधी व सरपंच, उपसरपंच, सदस्य व शेतकरी घोडेगाव येथील तहसील कार्यालयासमोर बुधवारी (ता. १०) लाक्षणिक उपोषण (Hunger Strike) करणार आहेत.

याबाबतचे निवेदन तहसीलदार रमा जोशी यांना दिल्याची माहिती पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखिले यांनी दिली. या निवेदनात म्हटले आहे, की लोणी, धामणी, शिरदाळे व पहाडदरा परिसरात गेल्या आठ दिवसांत अतिवृष्टी झाल्यामुळे बटाटा, सोयाबीन, वाटाणा, बाजरी, भुईमूग ही पिके १०० टक्के वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. काही पिके पूर्णपणे सडून गेली आहेत. या परिसरातील शेतकऱ्यांचे आर्थिक गणित या खरीप हंगामावर अवलंबून असते.

Crop Damage
Crop Protection : उष्णतेत पिकाची सहनशिलता वाढवण्यासाठी होत आहेत प्रयत्न

नियमानुसार ६५ टक्के पर्जन्य आणि ३३ टक्के नुकसान झाले, तरच शासकीय मदत मिळते, परंतु पर्जन्य मोजण्याचे साधन पारगाव (शिंगवे) या ठिकाणी आहे, तर पाऊस धामणी शिरदाळे परिसरात होत आहे. त्यामुळे पावसाचे मोजमाप योग्य पद्धतीने होत नाही. प्रत्यक्ष मात्र शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कृषी अधिकारी अथवा महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनी संपर्क केला असता समाधानकारक उत्तर मिळत नाही. पुढील दोन दिवसांत पंचनामे करून त्यावर कार्यवाही झाली नाही, तर आम्ही सर्व लोकप्रतिनिधी तसेच सरपंच, उपसरपंच, सदस्य लाक्षणिक उपोषण करणार आहेत. धामणीचे सरपंच सागर जाधव व शिवसेना उपतालुका प्रमुख अजित चव्हाण यांनी तहसीलदार जोशी यांना निवेदन दिले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com