Rain Update : परतीच्या पावसामुळे रायगडमध्ये शेतकरी चिंतातूर

दोन दिवस पुन्हा पाऊस पडल्याने बळीराजा चिंतातूर झाला आहे. पाऊस थांबला नाही, तर हातातोंडाशी आलेला मोत्याचा घास वरुणराजा हिरावून नेतो की काय? ही चिंता बळीराजाला पडली आहे.
Rain Update
Rain UpdateAgrowon

रसायनी : रसायनी परिसरात खरिपाच्या हंगामातील (Kharip season) अनेक शेतकऱ्यांचे भाताचे पीक कापणीला (Paddy Sowing) आले आहेत. मात्र, पाऊस पाठ सोडत नसल्याने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. दोन दिवस पुन्हा पाऊस पडल्याने बळीराजा चिंतातूर झाला आहे. पाऊस थांबला नाही, तर हातातोंडाशी आलेला मोत्याचा घास वरुणराजा हिरावून नेतो की काय?

Rain Update
Paddy Harvesting : भात कापणी वेळवर होणे गरजेचे

ही चिंता बळीराजाला पडली आहे. सध्या वातावरणात उकाडा असून, आकाश ढगाळलेले असल्याने परतीच्या पावसाची अजूनही शक्यता आहे. परिसरातील चावणे, आपटे, वडगाव, वासांबे मोहोपाडा पंचक्रोशीतील शेतकरी खरिपाच्या हंगामात भाताचे पीक घेत आहे.

Rain Update
Paddy Harvesting : सिंधुदुर्गात नवरात्रानंतर भातकापणी

यावर्षी पाऊस वेळेवर झाला असल्याने शेतकऱ्यांची खरिपाच्या हंगामातील भात लावणीची कामे वेळेवर झाली. पीकही चांगले आले आहे. अनेक शेतकऱ्यांचे पीक कापणीला आले आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले. आठ दिवसांपूर्वी झालेल्या वादळी, जोरदार पावसासह विजेच्या कडकडाटामुळे तळेगाव परिसरात भातपिकाचे नुकसान झाले आहे.

Rain Update
Paddy : भातपिकाला संततधारेचा धोका

त्यामुळे शेतकरी पुन्हा पावसाची धास्ती घेत आहे. शनिवारपासून पाऊस थांबला आहे. रविवारी मात्र हवामानात काहीसा बदल झाला आहे. वातावरणात उकाडा असून, आकाश ढगाळलेले आहे. अजूनही पावसाची शक्यता असल्याने शेतकरी काळजीत आहे.

पिकाची नासाडी होण्याची भीती

खोपोली : खोपोली-खालापूर परिसरात परतीचा पाऊस सुरू आहे. या पावसामुळे भातपिकाची नासाडी होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. खोपोली-खालापूरमध्ये भातपीक तयार आहे. अनेक ठिकाणी भातकापणीला सुरुवात झाली आहे; मात्र अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास जाणार की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे.

शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी भरत असल्याने भातपीक आडवे झाले आहेत. त्याला कोंब फुटण्याची स्थिती निर्माण झाली आहे. भातकापणीसाठी मजूर व अन्य जुळवाजुळव सुरू असतानाच मुसळधार पावसाने हजेरी लावली. यात शेतीचे नुकसान होत आहे.

शेतात पाणी भरल्याने तयार भाताला कोंब फुटण्याची भीती आहे, अशी चिंता केळवली येथील शेतकरी निवृत्ती दिसले यांनी व्यक्त केली. भाताचे पीक चांगले आले आहे. पाऊस थांबला की चार ते पाच दिवसांत कापणीचे काम सुरू करणार आहे. गुरुवार आणि शुक्रवारी पावसाचा जोर कमी आणि वादळ नव्हते. त्यामुळे भातपिकाचे नुकसान झाले नाही.

- नंदकुमार पाटील, शेतकरी, जुनी पोसरी

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com