Farmvibe Project : बारामतीत साकारणार फार्मव्हाईब प्रकल्प

मायक्रोसॉफ्ट, ऑक्सफर्ड विद्यापीठ ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट व ट्रस्टचे इनक्युबेशन सेंटर यांच्या वतीने तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारी शेती विकसित करण्याचा हेतू असलेल्या ‘सेंटर ऑफ एक्सलेन्स फॉर फार्माव्हाईब’ या उपक्रमाचा सोमवारी (ता. ७) बारामतीत ऐतिहासिक प्रारंभ झाला.
Farmvibe Project
Farmvibe ProjectAgrowon

बारामती ः मायक्रोसॉफ्ट (Microsoft), ऑक्सफर्ड विद्यापीठ (Oxford University) ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट (Agriculture Development Trust) व ट्रस्टचे इनक्युबेशन सेंटर यांच्या वतीने तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारी शेती विकसित (Agriculture Development) करण्याचा हेतू असलेल्या ‘सेंटर ऑफ एक्सलेन्स फॉर फार्माव्हाईब’ या उपक्रमाचा सोमवारी (ता. ७) बारामतीत ऐतिहासिक प्रारंभ झाला. बिल गेट्स (Bill Gates) यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प साकारत आहे.

Farmvibe Project
बारामती ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि मॅग्नेट सोसायटीत करार

ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार व ऑक्सफर्ड विद्यापीठातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभागाचे कोर्स डायरेक्टर डॉ. अजित जावकर यांच्यात या बाबतच्या कराराचे आदानप्रदान केले गेले. या प्रसंगी मायक्रोसॉफ्टचे कार्यकारी संचालक रणवीर चंद्रा, मायक्रोसॉफ्टचे प्रोग्रॅम मॅनेजर रियाज पिशोरी, सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार, विश्वस्त सुनंदा पवार, राजीव देशपांडे, डॉ. अविनाश बारवकर, मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे उपस्थित होते.

रणवीर चंद्रा म्हणाले, की कमी खर्चात किफायतशीर शेती व्हावी, धोके दूर व्हावेत, शेतक-यांच्या ज्ञानाचा वापर करून बेभरवशी शेती अधिक शाश्वत व्हावी, पर्यावरण रक्षणासोबतच अन्नधान्याचे उत्पादन वाढविण्यासाठी ऑक्सफर्ड व ट्रस्टच्या मदतीने मायक्रोसॉफ्ट हा प्रकल्प साकारण्यासाठी उत्सुक आहे.

Farmvibe Project
Cotton Market : बारामती बाजार समितीत कापूस खरेदी-विक्रीस प्रारंभ

डॉ. अजित जावकर यांनी आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचा वापर करून शेती अधिक शाश्वत करण्याचा प्रयत्न असून भविष्यात परदेशातून तज्ज्ञ आणण्यापेक्षा येथील युवकांनाच प्रशिक्षित करण्याचा मानस बोलून दाखविला. ज्येष्ठ नेते शरद पवार, प्रतापराव पवार, राजेंद्र पवार यांच्या पुढाकारातून हा प्रकल्प साकारत असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रतापराव पवार म्हणाले, की मायक्रोसॉफ्ट, ऑक्सफर्ड व ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या एकत्रित प्रयत्नातून या प्रकल्पाद्वारे निश्चित अद्भूत घडेल, केवळ बारामती भारतातच नव्हे तर जगात एक पथदर्शी प्रकल्प म्हणून या प्रकल्पाचा नावलौकीक होईल. बारामती भविष्यात नॉलेज क्रिएशन सेंटर म्हणून उदयास येईल. डॉ. अजित जावकर यांनी यात पुढाकार घेतल्याने आज बारामतीत आंतरराष्ट्रीय प्रकल्प कार्यान्वित होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

मायक्रोसॉफ्टचे जगातील दुसरे केंद्र बारामतीत...

जगात अमेरिकेतील वॉशिंग्टन नंतर बारामतीतील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या जागेत दुसरे अत्याधुनिक सेंटर मायक्रोसॉफ्ट उभारणार आहे. वॉशिंग्टनच्याच दर्जाचे हे सेंटर असेल अशी माहिती या प्रसंगी देण्यात आली. या निमित्ताने पुन्हा एकदा बारामती जगाच्या नकाशावर ठळकपणे झळकली आहे.

काय असेल हा प्रकल्प

- मायक्रोसॉफ्ट संशोधनाच्या साखळीतील शेती केंद्रित तंत्रज्ञानाचा नवीन भाग

- मशिन लर्निंग अल्गोरिदम तंत्रज्ञानाद्वारे सुपीकता वाढविणे, उत्पादन वाढ, पीकपद्धतीचे नियोजन, पिकांचे आरोग्य उत्तम राखणे, गुणवत्तावाढ व खर्च कमी करणे

- ड्रोन, उपग्रह, जमिनीतील सेन्सर्स याद्वारे माहिती गोळा करून भविष्यातील अत्याधुनिक शेतीचा प्रकल्प साकारणार

- खत, तणनाशक, पाणी व्यवस्थापनासह पावसाचा अंदाज, हवामानातील बदल, या आव्हानांचा तंत्रज्ञानाच्या मदतीने वापर व सामोरे जाणे.

- हवामानाचा पिकांवर होणारा विपरीत परिणाम कमी करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट, ऑक्सफर्ड व ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट एकत्र काम करणार

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com