
Onion Rate News बार्शी, जि. सोलापूर ः शेतकऱ्यांना कांद्यासाठी हमीभाव (MSP For Onion) मिळावा, कमी भावाने विकलेल्या कांद्याचे अनुदान (Onion Subsidy) मिळावे यांसह इतर मागण्यांसाठी बोरगाव झाडी (ता. बार्शी) येथील शेतकरी राजेंद्र चव्हाण यांनी तहसील कार्यालयासमोर मागील तीन दिवसांपासून सुरू केलेले आमरण उपोषण (Farmer Hunger Strike) आमदार राजेंद्र राऊत यांच्या आश्वासनानंतर मागे घेतले.
सोलापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अडत व्यापाऱ्याकडे दहा पिशव्या कांदा विक्री केल्यानंतर सर्व खर्च वजा करून अडत व्यापाऱ्याने चव्हाण यांना दोन रुपयांचा धनादेश दिला होता. तो पंधरा दिवसांनी खात्यावर जमा होणार आहे.
दोन रुपयांच्या धनादेशासाठी सोलापूरला जाण्या-येण्यासाठी तीनशे रुपये खर्च येतो, असा प्रश्न उपस्थित करत या घटनेची राज्य शासनाने दखल घ्यावी, शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्याव्यात, कांद्यासाठी हमीभाव द्यावा अशा मागण्या चव्हाण यांनी निवेदनाद्वारे केल्या आहेत.
चव्हाण यांच्या समवेत यशवंत कोकाटे, दादासाहेब शेळके, बाबा बोधले यांनीही उपोषणास बसून पाठिंबा दिला होता. पण दोन दिवसांनंतर उपोषणस्थळी आमदार राजेंद्र राऊत यांनी भेट देऊन उपोषणकर्त्या शेतकऱ्यांशी चर्चा केली.
तसेच जिल्ह्यातील सर्व आमदार लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कांदा पिकाची माहिती देणार आहोत. तसेच दोन रुपयांच्या पट्टीच्या विषयाबाबत बाजार समितीचे सभापती विजयकुमार देशमुख यांच्याशी चर्चा झाली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.