Agriculture Department : कृषी सहायक संघटनेचे ३० जानेवारीपासून मुंबईत उपोषण

राज्यातील कृषी सहायकांच्या मागण्या वारंवार विनंती करूनही सुटत नसल्याने अखेरीस आता मुंबईत ३० जानेवारीपासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषण केले जाणार आहे.
Agriculture Department
Agriculture DepartmentAgrowon

अकोला ः राज्यातील कृषी सहायकांच्या मागण्या वारंवार विनंती करूनही सुटत नसल्याने अखेरीस आता मुंबईत ३० जानेवारीपासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषण (Fasting Protest) केले जाणार आहे. याबाबत कृषी सहायक संघटनेने आंदोलनासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली आहे.

Agriculture Department
Agriculture Department : पदोन्नतीच्या फाइलमधील पदे, बदली ठिकाणांमध्ये फेरफार?

या बाबतच्या निवेदनात म्हटले, की कृषी सहायक हा कृषी विभागाचा कणा आहे. अपुऱ्या सोयीसुविधा असतानाही गावपातळीवर शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करीत आहे. कृषी सहायकांच्या समस्या वर्षानुवर्षे सुटलेल्या नाहीत.

त्यामुळे आता कृषी सहायकांच्या मागण्यांसाठी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना २ जानेवारीला निवेदन देत २५ जानेवारीपर्यंत तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली आहे.

या काळात काहीही न झाल्यास ३० जानेवारीपासून आंदोलनावर संघटना ठाम आहे. त्यासाठीच महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेने आंदोलनाच्या दृष्टीने पोलिसांकडे परवानगीबाबत अर्ज दिला आहे. संघटनेचे सरचिटणीस शिवानंद यांनी दिलेल्या अर्जात उपोषण करण्याबाबत परवानगी मागितली आहे.

Agriculture Department
Agriculture Department : आंतरसंभागीय बदल्यांमध्ये मनमानी कारभार

...या आहेत मागण्या

- सर्व शासकीय अॅप वापरण्यासाठी मोबाईल व्यवस्थापन खर्च व डेटा चार्जेसची रक्कम म्हणून प्रति महिना १५०० रुपये मंजूर करण्यात यावेत. संगणकीय कामे करण्याकरिता लॅपटाॅप पुरविण्यात यावेत

- वर्ग तीन कर्मचाऱ्यांच्या नियतकालीक पदोन्नत्या, बदल्या, पदोन्नतीतील अशतः बदल, आंतरसंभागीय बदल्या, मुदतपूर्व निकडीच्या बदल्यांना दिलेली स्थगिती उठवून त्या विहित नियमानुसार चालू ठेवाव्यात

- कृषी सेवक मानधनामध्ये रक्कम रुपये ६००० वरून १६५०० रुपये वाढ करण्याबाबत मुख्य सचिवांच्या बैठकीत मान्य झाले आहे. याला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळावी.

- कृषी सहायक संवर्गाची मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असून ती भरावीत

- कृषी सहायक संवर्गास मिळणाऱ्या कायम प्रवास भत्त्यामध्ये महागाई निर्देशांकानुसार वाढ करण्यात यावी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com