Orange Fruit Fall : संत्रा बागायतदारांचे उपोषण

राज्यात सुमारे दीड लाख हेक्टरवर संत्रा लागवड आहे. त्यापैकी सर्वाधिक एक लाख हेक्टर क्षेत्र अमरावती जिल्ह्याच्या वरुड, मोर्शी, चांदूरबाजार, अंजनगावसुर्जी या तालुक्यांमध्ये विभागले आहे.
Orange
Orange Agrowon

अमरावती : संत्रापट्ट्यात दरवर्षी होणाऱ्या फळगळ नियंत्रणासाठी (Fruit Fall) कोणत्याच प्रकारची तांत्रिक शिफारस देण्यासोबतच नवे वाण, तंत्रज्ञान देण्यातही अपयशी ठरलेल्या केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेची (Central Citrus Research Institute) शेतकऱ्यांनी शनिवारी (ता.१५) दशक्रिया करून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. त्यानंतर आज (ता.१६) संत्रा बाग (Orange Orchard) काढण्याकरीता शेतकरी सरसावले.

राज्यात सुमारे दीड लाख हेक्टरवर संत्रा लागवड आहे. त्यापैकी सर्वाधिक एक लाख हेक्टर क्षेत्र अमरावती जिल्ह्याच्या वरुड, मोर्शी, चांदूरबाजार, अंजनगावसुर्जी या तालुक्यांमध्ये विभागले आहे. देशांतर्गत लिंबूवर्गीय पिकातील संशोधनाला दिशा देण्याचे काम असलेली केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था नागपुरात आहे.

Orange
Orange Compensation : फळबागायतदारांना नुकसान भरपाई कधी मिळणार ?

मात्र गेल्या काही वर्षांत संत्रापट्ट्यात कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. अधिक तापमान आणि अधिक पावसात बुरशीजन्य रोग वाढतात. त्यातूनच फळगळीसारख्या समस्येला सामोरे जावे लागते. या वर्षी तापमानात झालेली वाढ आणि अधिक पावसामुळे सुमारे ७०० कोटी रुपयांचे नुकसान फळगळीमुळे झाले, असा अंदाज ‘महाऑरेंज’ने वर्तविला आहे.

Orange
Sweet Orange : मराठवाड्यातील मोसंबीवर ‘मंद ऱ्हास’चे संकट ः डॉ. पाटील

संत्रा बागांमध्ये उत्पादकता देखील कमी झाल्याने अनेक बागायतदार वैतागून आपली बाग काढण्यावर भर देत आहेत. गेल्या काही वर्षांत हजारो हेक्टरवरील बागा काढण्याचे काम संत्रापट्ट्यात झाले आहे. या समस्यांची कोणत्याच प्रकारची दखल लिंबूवर्गीय संस्थांकडून घेतली जात नाही. अखेरीस त्रस्त शेतकऱ्यांनी संस्थेच्या निष्क्रिय तज्ज्ञांची दशक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

शनिवारी (ता.१५) जसापूर येथील प्रदीप बंड यांच्या शेतात हे आंदोलन झाले. या वेळी शेतकऱ्यांनी टक्कल केले. आंदोलनानंतर प्रदीप बंड हे त्याच शेतात बेमुदत उपोषणाला बसले. प्रदीप बंड यांच्यासह दहा संत्रा बागायतदार त्यांच्या शेतातील संत्रा झाडे जेसीबीच्या साह्याने टप्प्याटप्प्याने तोडण्यास सुरुवात करण्यात आली.

संत्रापट्ट्यातील समस्या सोडवणुकीसाठी लिंबूवर्गीय संशोधन संस्थेने कोणतेच प्रयत्न केले नाहीत. परिणामी, संत्रा बागा काढून टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे निषेध करण्यासाठी दशक्रिया करण्याचा निर्णय घेतला. बेमुदत उपोषणही केले जाईल.
प्रदीप बंड, संत्रा बागायतदार, जसापूर, अमरावती

शेतकरी तोडणार ४०५० संत्रा झाडे

झाडे तोडण्याऱ्या शेतकऱ्याचे नाव... तुटणाऱ्या झाडांची संख्या

प्रदिप बंड...३५०

अभिजित पोहोकार...६००

मनोज गणोरकर...१०००

विजय नारायण बंड...३५०

नितीन सुधाकर बंड...३५०

रामेश्वर पोहोकार...३५०

विलास बंड...३००

दिनेश कानफाळे...३५०

दिवाकर बोरवार...२००

मनोज घोडेस्वार...२००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com