Agriculture Electricity News : नादुरुस्त रोहित्रे तातडीने दुरुस्त करावीत

Agriculture Irrigation : शेतकऱ्यांना विजेची समस्या उद्‍भवू नये, यासाठी विद्युत वितरण कंपनीने नादुरुस्त रोहित्रे तातडीने दुरुस्त करावीत आणि नवीन देखील बसवावीत, ’’अशा सूचना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी ‘महावितरण’ला दिल्या आहेत.
Agriculture Electricity
Agriculture ElectricityAgrowon

Sangli News : ‘‘शेतकऱ्यांना विजेची समस्या उद्‍भवू नये, यासाठी विद्युत वितरण कंपनीने नादुरुस्त रोहित्रे तातडीने दुरुस्त करावीत आणि नवीन देखील बसवावीत, ’’अशा सूचना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी ‘महावितरण’ला दिल्या आहेत.

Agriculture Electricity
Cold Storage Electricity : भरमसाट वीज दरवाढीने ‘कोल्ड स्टोअरेज’ ‘तापले’!

जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. खाडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची सभा झाली. खासदार धैर्यशील माने, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार विश्‍वजित कदम, प्रा. जयंत आसगावकर, सुधीर गाडगीळ, अनिल बाबर, मानसिंगराव नाईक, विक्रम सावंत, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव उपस्थित होते.

Agriculture Electricity
Electricity News : खंडित विजेला फोर्स लोडशेडिंगचे जोड

‘‘सौर कृषी वाहिनी’ योजना प्रभावीपणे राबवा’

‘‘अनुसूचित जाती घटक योजनेमध्ये ८३.८१ कोटी, आदिवासी घटक योजनेत ४० लाख निधी खर्च झाला आहे. निधी त्या त्या विकासकामांवर विहित वेळेत खर्च झाला पाहिजे. या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच यंत्रणांनी याचे नियोजन करावे.

समाधानकारक पाऊस होईपर्यंत पाणीउपसा योजना सुरू राहणार आहेत. जिल्ह्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीचे काम राज्यात आदर्शवत व्हावे. शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज मिळावी, यासाठी ही योजना जिल्ह्यात प्रभावी व गतीने राबवावी,’’ असे आवाहन डॉ. खाडे यांनी केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com