कोकणासह विदर्भात पावसाला पोषक हवामान

राज्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम
कोकणासह विदर्भात पावसाला पोषक हवामान
Rain UpdateAgrowon

पुणे : राज्याच्या बहुतांशी भागात मॉन्सून (Monsoon) दाखल झाला असला तरी अद्यापही जोरदार पावसाची (Heavy Rain) प्रतीक्षा आहे. कोकण आणि विदर्भात पावसाला पोषक हवामान (Climate Condition) झाले आहे. आज (ता. १९) कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता (Rain Prediction) आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा, तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने (Weather Department) वर्तविला आहे.

राजस्थानपासून मध्य अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. तसेच उत्तर राजस्थानपासून मनीपूरपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा पूर्व-पश्चिम विस्तारला आहे. तमिळनाडूच्या किनाऱ्यालगत चक्राकार वारे वाहत आहेत. कर्नाटकपासून तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याचा संकेत आहे.

राज्यात होत असलेल्या ढगाळ हवामानामुळे राज्याच्या कमाल तापमान कमी होत आहे. शनिवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्याच्या अनेक भागात कमाल तापमान ३२ ते ३६ अंशांच्या दरम्यान आहे. मात्र पावसाच्या दडीने उकाड्यात वाढ झाली आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, मराठवाडा, विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.

शनिवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांत राज्याच्या विविध भागात पडलेला पाऊस, मिलीमीटरमध्ये ( स्रोत : हवामान विभाग) :

कोकण : माथेरान २१, वैभवाडी २६,

मराठवाडा : लातूर २३, निलंगा ४२, मुखेड ४१,

विदर्भ : वरोरा २०, देसाईगंज ४६.

झारखंड, बिहारमध्ये मॉन्सूनची प्रगती

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शनिवारी (ता.१८) पूर्व भारतातील वाटचाल कायम ठेवली आहे. मॉन्सूनने पुढे चाल करत पश्चिम बंगाल, झारखंडसह बिहारच्या आणखी काही भागात प्रगती केली आहे. पुढील तीन दिवसांत विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, बंगालचा उपसागर व्यापून, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंडच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट)

कोकण : ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

विदर्भ : यवतमाळ, चंद्रपूर.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

मराठवाडा : नांदेड, लातूर, हिंगोली.

विदर्भ : बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com