Monsoon Update : ईशान्य मॉन्सूनसाठी अनुकूल हवामान

महाराष्ट्रावरील हवेचे दाब या आठवड्यात बदलण्यास सुरुवात होईल. आठवड्याच्या सुरुवातीस महाराष्ट्रावर १००६ हेप्टापास्‍कल, तर अखेरीस १००८ हेप्‍टापास्‍कल इतके हवेचे दाब अधिक राहतील.
Monsoon Update
Monsoon Update Agrowon

महाराष्ट्रावरील हवेचे दाब या आठवड्यात बदलण्यास सुरुवात होईल. आठवड्याच्या सुरुवातीस महाराष्ट्रावर १००६ हेप्टापास्‍कल, तर अखेरीस १००८ हेप्‍टापास्‍कल इतके हवेचे दाब अधिक राहतील. त्‍यामुळे कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व दक्षिण पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी होईल. अल्पशा प्रमाणात पाऊस, ढगाळ हवामान आणि पावसात उघडीप अशी सर्वसाधारण स्‍थिती राहील. मात्र विदर्भात वाऱ्याची दिशा उत्तरेकडून राहण्यामुळे विस्‍तृत स्‍वरूपात पावसाची शक्‍यता राहील. मध्य व पूर्व विदर्भात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्‍यता आहे.

वाऱ्याच्या दिशेत बदल होत असून ते वायव्येकडून ईशान्येकडून दक्षिणेकडे वाहतील. यालाच ‘परतीचा मॉन्सून’ असे म्हटले जाते. परतीच्या मॉन्सूनला साधारण १ सप्टेंबरच्या दरम्यान सुरुवात होईल. आकाश अंशतः ढगाळ राहील. कोकणात पावसाचे प्रमाण कमी होऊन महाराष्ट्राच्या पूर्व भागात पावसात वाढ होईल. दुष्काळी पट्ट्यातही या पुढील काळात चांगले पाऊसमान राहील.

१ जून ते १७ ऑगस्‍टपर्यंतच्या पाऊसमानाचा अभ्यास केल्‍यास वर्धा, नागपूर, नांदेड, नाशिक या जिल्ह्यांत तेथील सरासरीच्या ७० टक्‍के अधिक पाऊस झाला आहे. तसेच उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ व पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. तर सांगली जिल्ह्यात तेथील सरासरीपेक्षा १३ टक्‍के पाऊस कमी झाला आहे.

Monsoon Update
Cotton : नव्या कापसाला १२ हजाराचा दर ?

कोकण ः

आज व उद्या (ता.२८,२९) सिंधुदुर्ग, रत्‍नागिरी, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत प्रतिदिनी ५ ते ७ मिमी पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून व नैर्ऋत्‍येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ५ किमी राहील. कमाल तापमान सिंधुदुर्ग व रत्‍नागिरी जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस, तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सिंधुदुर्ग, रत्‍नागिरी व रायगड जिल्ह्यांत २३ ते २४ अंश सेल्‍सिअस, तर ठाणे व पालघर जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९१ ते ९२ टक्‍के, तर दुपारची ६६ ते ७० टक्‍के राहील.

उत्तर महाराष्ट्र ः

नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव या जिल्ह्यांत आज (ता.२८) रोजी पावसाची शक्‍यता नाही. उद्या (ता.२९) रोजी नाशिक, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत ४ ते ६ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा जळगाव जिल्ह्यात वायव्येकडून तर नाशिक, धुळे व नंदूरबार जिल्ह्यात नैर्ऋत्‍येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते १० कि.मी. राहील. सर्वच जिल्ह्यात कमाल तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता नाशिक जिल्ह्यात ९२ टक्‍के, तर धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत ८२ ते ८८ टक्‍के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ५४ ते ६२ टक्‍के राहील.

मराठवाडा ः

आज (ता.२८) हिंगोली, जालना व परभणी जिल्ह्यांत पावसात उघडीप राहील. उस्‍मानाबाद, लातूर, नांदेड, बीड व औरंगाबाद जिल्ह्यांत आज ६ ते १० मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. उद्या (ता.२९) बीड, परभणी, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत ३ ते ५ मि.मी., तर उस्‍मानाबाद, लातूर, नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत ८ ते १५ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. या आठवड्यात पावसाचे प्रमाण अल्‍प राहील. या आठवड्यापासून ईशान्य मॉन्सूनसाठी हवामान घटक अनुकूल बनत आहेत. त्‍यामुळे वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यात १३ ते १४ कि.मी. राहील. सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. किमान तापमान उस्‍मानाबाद, लातूर व जालना जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस, तर नांदेड, बीड, परभणी, हिंगोली व औरंगाबाद जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८० ते ८७ टक्‍के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५२ ते ६० टक्‍के राहील.

Monsoon Update
Soybean : गडहिंग्लज तालुक्यात सोयाबीनवर तांबेरा

पश्‍चिम विदर्भ ः

आज (ता. २८) अमरावती जिल्ह्यात ४८ मि.मी., तर अकोला जिल्ह्यात १० मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत पावसात उघडीप राहील. उद्या (ता. २९) बुलडाणा, अकोला व वाशीम जिल्ह्यांत ५ ते १५ मि.मी., तर अमरावती जिल्ह्यात २८ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून आणि ताशी वेग १४ ते १६ कि.मी. राहील. कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८१ ते ८६ टक्‍के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५८ ते ६३ टक्‍के राहील.

मध्य विदर्भ ः

आज (ता.२८) रोजी यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यात २५ ते ३० मि.मी. पावसाची शक्यता आहे. उद्या (ता. २९) वर्धा व यवतमाळ जिल्ह्यात ११ ते २१ मि.मी. व नागपूर जिल्ह्यात ४० मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून आणि ताशी वेग १० ते १३ कि.मी. राहील. कमाल तापमान सर्वच जिल्ह्यात ३१ ते ३२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८४ ते ८७ टक्‍के व दुपारची ५८ ते ६० टक्‍के राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.

पूर्व विदर्भ ः

आज (२८) चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत २६ ते ३७ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. उद्या (ता. २९) चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यात ३२ ते ४४ मि.मी. तर गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत ५१ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून आणि ताशी वेग ४ ते ८ किमी राहील कमाल तापमान भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ३१ ते ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९१ ते ९५ टक्‍के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६० ते ७४ टक्‍के राहील.

पश्‍चिम महाराष्ट्र ः

आज व उद्या (ता.२८, २९) पुणे व नगर जिल्ह्यांत ४ ते ५ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. तर कोल्‍हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांत आज व उद्या १४ ते १५ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून आणि ताशी वेग ६ ते १० किमी राहील. कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८४ ते ९५ टक्‍के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४८ ते ६७ टक्‍के राहील.

कृषी सल्‍ला ः

- रब्बी ज्वारी पेरणीसाठी निवडलेल्या कोरडवाहू क्षेत्रात बंदिस्‍त वाफे तयार करावेत. जेणेकरून पावसाचे पडलेले पाणी जमिनीत खोलवर मुरेल.

- आडसाली ऊस लागवडीत तणांचा प्रादुर्भाव पाहून आवश्यकतेनुसार तण नियंत्रण करावे.

- फळबागेत नवीन लागवड कलमांना काठीचा आधार द्यावा.

- भात खाचरात पाण्याची पातळी ५ सेंमी पर्यंत नियंत्रित करावी.

- पावसाच्या प्रमाणानुसार खाचरातील पाणी बाहेर काढून नवीन पाणी साठवावे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com