Weather Update : पावसाला पोषक हवामान

राज्याच्या वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळत असून, उन्हाचा चटका आणि उकाडाही वाढला आहे. आज (ता. ६) विदर्भ, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि तळ कोकणात विजांसह पावसाची शक्यता आहे.
Monsoon Update
Monsoon UpdateAgrowon

पुणे : राज्याच्या वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी (Rainfall) कोसळत असून, उन्हाचा चटका (Temperature) आणि उकाडाही (Heat) वाढला आहे. आज (ता. ६) विदर्भ, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि तळ कोकणात विजांसह पावसाची शक्यता (Rain Forecast With Lightning) आहे. तर उर्वरित राज्यात कमाल तापमान आणि उकाड्यातील वाढ कायम राहून, ढगाळ हवामानासह (Cloudy Weather) हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने (Weather Department) वर्तविला आहे.

Monsoon Update
Crop Damage : साडेसात लाख अतिवृष्टीग्रस्त शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा गंगानगर, हिस्सार, गोरखपूर, मिर्झापूर, जलपैगुरी ते नागालॅण्ड पर्यंत सक्रिय आहे. उत्त अंतर्गत कर्नाटक ते कोमोरिन भागापर्यंत हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. कोमोरिन परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. पूर्वमध्य बंगालच्या उपसागरात असलेल्या चक्राकार वाऱ्यामुळे बुधवारपर्यंत (ता. ७) या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

गुरुवारपासून (ता. ८) राज्यात पाऊस वाढण्याचे संकेत आहेत. विदर्भ, मराठवाड्यात अनेक ठिकाणी तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे सर्वाधिक ११० मिलिमीटरची नोंद झाली आहे. आज (ता. ६) विदर्भ, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र, तळकोकणात विजांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान, उकाड्यातील वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे.

Monsoon Update
Rain Update : राज्यातील धरणांत ८४ टक्के पाणीसाठा

सोमवार (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलीमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :

कोकण : महाड, वसई प्रत्येकी ५०, पोलादपूर ४०, खालापूर ३०, मुरबाड ३०.

मध्य महाराष्ट्र : जेऊर ६०, जामनेर, लोणावळा, श्रीगोंदा प्रत्येकी ५०, बोधवड, इंदापूर, शिरूर, मोहोळ प्रत्येकी ३०.

मराठवाडा : निलंगा ११०, गंगापूर ८०, उदगीर, देवणी प्रत्येकी ५०, अहमदपूर, जळकोट प्रत्येकी ४०, बदनापूर, शिरूर अनंतपाळ, लोहारा प्रत्येकी ३०.

विदर्भ : नरखेड, पारशिवणी, सावनेर, काटोल प्रत्येकी ५०, दारव्हा, अर्वी, नांदगावकाझी, मोदा, धामणगाव रेल्वे प्रत्येकी ४०, तुमसर, कुही, बाभुळगाव, रामटेक, मलकापूर, महागाव, चांदूर रेल्वे, तिवसा, दिग्रस, करंजलाड, हिंगणा, कळमेश्वर, नेर, अमरावती, कामठी, नागपूर, प्रत्येकी ३०.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

कोकण : सिंधुदुर्ग.

मध्य महाराष्ट्र : नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर.

मराठवाडा : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड.

विदर्भ : बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com