Bacchu Kadu : संत्रा उत्पादकांचे उभारणार फेडरेशन : बच्चू कडू

संत्रा बगायतदारांपर्यंत पोहोचविणार तंत्रज्ञान
Bacchu Kadu
Bacchu KaduAgrowon

नागपूर : ‘‘संत्रा उत्पादकांना (Orange Growers) वातावरणातील बदलाच्या पार्श्‍वभूमीवर फळगळतीसह इतर अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर या क्षेत्रात संशोधनाला चालना मिळण्यासोबतच नवे वाण उपलब्ध व्हावे याकरिता शेतकऱ्यांच्या प्रभावी दबाव गटाची बांधणी येत्या काळात केली जाईल,’’ अशी माहिती आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी दिली. काटोल भागातील संत्रा उत्पादकांच्या बागांना भेट दिल्यानंतर माहिती दिली.

Bacchu Kadu
Crop Damage : नुकसान होऊनही अकोल्याची सुधारित पैसेवारी ५३ पैसे

राज्यात सुमारे दीड लाख हेक्‍टर, तर अमरावती जिल्ह्यात सुमारे एक लाख हेक्‍टरवर संत्रा लागवड आहे. आमदार बच्चू कडू यांचा मतदार संघ असलेल्या चांदूर बाजार परिसरात संत्रा बागायतदार सातत्याने होणारी फळगळ, बुरशीजन्य रोगांचा वाढता प्रादुर्भाव तसेच वाय-बहराच्या समस्येने त्रस्त आहेत.

केंद्रीय लिंबूवर्गीय संस्थेकडून याविषयी कोणतेच मार्गदर्शन केले जात नसल्याने या विरोधात शेतकऱ्यांनी उपोषणही केले होते. या साऱ्या प्रकाराची दखल घेत शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचावे याकरिता बच्चू कडू यांनी स्वतःच पुढाकार घेत काटोल परिसरातील शास्त्रोक्‍त व्यवस्थापन करणाऱ्या संत्रा बागायतदारांच्या बागांना भेटी दिल्या. महाऑरेंजचे संचालक काटोल येथील मनोज जवंजाळ यांनी सेंद्रिय पद्धतीने इंडो-इस्राईल तंत्रज्ञानाच्या आधारे दर्जेदार संत्रा बाग फुलविली आहे.

संत्रा उत्पादक अनेक समस्यांनी ग्रस्त आहेत. त्यांना संशोधनात्मक पातळीवर मार्गदर्शन मिळावे याकरिता संत्रा उत्पादकांचा फेडरेशनच्या माध्यमातून दबावगट तयार करण्याचे प्रस्तावीत आहे. हे फेडरेशन जागतिकस्तरावर उपलब्ध तंत्रज्ञान संत्रा उत्पादकांपर्यंत पोहोचवेल त्याकरिता दर दोन महिन्यांनी प्रयोगशील संत्रा बागायतदारांची बैठक घेण्यात येणार आहे.

- बच्चू कडू, आमदार व अध्यक्ष, प्रहार जनशक्‍ती पक्ष

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com