Fertilizer : खत परवाना कारवाई संशयाच्या भोवऱ्यात

अकोल्याचे तत्कालीन प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कांताप्पा खोत यांनी शेतकऱ्याची तक्रार तसेच एक व्हायरल व्हिडिओची दखल घेत पाटणी ट्रेडर्स या खतविक्रेत्यावर कारवाई केली होती.
Bogus Fertilizer
Bogus Fertilizer Agrowon

अमरावती : कृषी अधिकारी बदलताच नकारात्मक अहवाल सकारात्मक दाखवून खत (Fertilizer) विक्रेत्यांच्या परवाना रद्दची कारवाई स्थगित करून त्याऐवजी ४० दिवसांच्या कालावधीकरिता निलंबन करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अकोला येथे घडलेल्या या प्रकाराची तक्रार शेतकऱ्यांसह शिवसेनेने केल्यानंतर विभागीय कृषी संचालक सहसंचालक यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिल्याने खळबळ उडाली आहे.

Bogus Fertilizer
Fertilizer : ‘एक राष्ट्र एक खत’ धोरण केंद्राकडून लागू

अकोल्याचे तत्कालीन प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कांताप्पा खोत (Kantappa Khot) यांनी शेतकऱ्याची तक्रार तसेच एक व्हायरल व्हिडिओची दखल घेत पाटणी ट्रेडर्स या खतविक्रेत्यावर कारवाई केली होती. तपासणीअंती ही कारवाई करण्यात आली. त्या वेळी साठा पुस्तिकेत नोंद असतानाही गोदामात मात्र खत नव्हते. पॉस मशिनद्वारे खत विक्री न करणे, लिंकिंग करून खत विकणे, लिंकिंग साहित्य घेण्यास नकार देणाऱ्या शेतकऱ्याला अपमानित करून बाहेर काढणे या बाबी समोर आल्या होत्या, त्याची नोंद अहवालात देखील घेण्यात आली आहे.

Bogus Fertilizer
Fertilizers : युरियाचा योग्य वापर आवश्यक...

या आधारे पाटणी ट्रेडर्सचा किरकोळ खतविक्री परवाना रद्द करण्यात आला. मात्र त्यानंतरच्या घडामोडीत कृषी सेवा केंद्रधारकांनी तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी खोत हे पैशाची मागणी करीत असल्याचा आरोप केला. त्यांचे निलंबन अथवा बदली करावी, अशी मागणी त्यांनी केली. दबाव वाढल्याने ते रजेवर गेले. या दरम्यान, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदाचा प्रभार आरिफ शहा यांच्याकडे सोपविण्यात आला. त्यांनी परवाना रद्दची कारवाई स्थगित करून ४० दिवसांकरिता परवाना निलंबनाचे आदेश दिले आहेत. त्यामुळे हे सर्व प्रकरण सशंयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. विशेष म्हणजे गुण नियंत्रण अधिकारी नितीन लोखंडे यांनी या प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावल्याचा संशय आणि आरोपदेखील शिवसेना नेते गोपाल दातकर यांनी तक्रारीत केला आहे.

शेतकऱ्यांसह शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तसेच जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेता गोपाल दातकर यांनी तक्रार केली आहे. पाटणी ट्रेडर्सप्रकरणी परवाना कारवाई संदर्भात त्यांचे काही आक्षेप आहेत. त्याची दखल घेत वाशीमचे जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी शंकर तोटावार यांच्या अध्यक्षतेत तीन सदस्यीय समिती स्थापना करण्यात आली आहे. समितीच्या अहवालाअंती पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाईल.
किसन मुळे, विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती
समिती अध्यक्षपदी माझी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या समितीने कामकाज सुरू केले नाही. पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर समिती चौकशी करून अहवाल सादर करेल. -
शंकर तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वाशीम तसेच चौकशी समिती अध्यक्ष
खत परवानाधारक पाटणी ट्रेडर्स यांनी विभागीय कृषी सहसंचालक यांच्याकडे अपील दाखल केले होते. त्यात त्यांची पुन्हा सुनावणी घेण्याचे आदेश सहसंचालकांनी दिले. त्यानुसार पुन्हा सुनावणी घेण्यात आली. त्या आधारे परवाना रद्दची कारवाई स्थगिती करून ४० दिवसांकरिता परवाना रद्द करण्यात आला आहे. ही सारी प्रक्रिया नियमानुसार आहे. काही आक्षेपार्ह मुद्द्यांवर संबंधित विक्रेत्याने खुलासा सादर केला आहे.
आरिफ शहा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com