Bharat Fertilizers: ‘भारत’ ब्रॅन्डने होणार खतांची विक्री

पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते अनावरण : दिल्लीत ‘पीएम किसान सन्मान संमेलन २०२२’
Bharat fertilizers
Bharat fertilizersAgrowon

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ः केंद्र सरकारकडून ‘पंतप्रधान भारतीय जन खत अभियान - एक देश एक खत’ (Prime Minister Bharatiya Jan Khat Abhiyan - One Country One Fertilizer) या नव्या योजनेअंतर्गत सर्व खत कंपन्यांना ‘भारत’ या एकाच ब्रॅन्डखाली अनुदानित खतांची विक्री करण्याचे बंधनकारक करण्यात आले असून ‘पीएम किसान सन्मान संमेलन २०२२’ या दोन दिवसीय कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते ‘भारत’ या खताच्या ब्रॅन्डचे (Bharat Manure) अनावरण करण्यात आले.

Bharat fertilizers
Pm kIsan : ‘पीएम किसान’चा बारावा हप्ता दिवाळीपूर्वी

दिल्ली येथे सोमवारी (ता. १७) झालेल्या या कार्यक्रमात केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि रसायने आणि खते मंत्रालयाचे मंत्री मनसुख मांडविया, कृषी शास्त्रज्ञ उपस्थित होते. संपूर्ण देशामध्ये युरिया, डीएपी, एमओपी आणि एनपीके खतांची या एकाच ब्रॅन्ड खाली विक्री केली जाणार आहे. तसेच खतांत होणारी भेसळ आणि जड मालवाहतुकीवर देण्यात येणारे अनुदान घटविण्यासाठी याची मदत होणार आहे.

Bharat fertilizers
PM Kisan : ‘पीएम किसान’च्या कामाला प्राधान्य द्यावे : श्रीवास्तव

तसेच या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी एका ई-नियतकालिकाचेही अनावरण करण्यात आले. या नियतकालिकामधून खत क्षेत्रामध्ये स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील बदल, अलीकडील विकास, बदलत्या किमती, उपलब्धता आणि वापर आदींबाबत माहिती दिली जाणार आहे.

देशभरात ६०० कृषी समृद्धी केंद्रे

त्याचबरोबर पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते देशभरात ६०० पीएम किसान समृद्धी केंद्रांची सुरुवात करण्यात आली आहे. या केंद्रांवर कृषी क्षेत्रातील सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. देशभरात ३.३ लाख किरकोळ खत विक्रेत्या दुकानांचे ‘पीएम-केएसके’ केंद्रात रूपांतर केले जाणार आहे. कृषी समृद्धी केंद्रांतून बियाणे, खते आणि कृषी अवजारे या कृषी निविष्ठांची विक्री केली जाणार आहे. त्याचबरोबर माती, बियाणे आणि खते परीक्षण ही केले जाणार आहे. तसेच शासकीय योजनांची माहिती दिली जाणार आहे.

बळीराजाला दिवाळी गिफ्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, पंतप्रधान शेतकरी सन्मान योजने अंतर्गत (पीएम किसान सम्मान) १६ हजार कोटी रुपयांचा १२ वा हप्ता दिल्लीत सोमवारी (ता. १७) झालेल्या एका विशेष कार्यक्रमात कोट्यवधी लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट जमा केला. लाभार्थी शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारने ‘दिवाळी आधी दिलेली दिवाळी गिफ्ट’ असे याचे वर्णन करण्यात येत आहे.

पीएम किसान पोर्टल वरील नोंदणीकृत १२ कोटी लहान शेतकऱ्यांना प्रत्येकी २-२ हजार रुपये, याप्रमाणे वर्षाला सहा हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्याची ही योजना आहे. मुख्यत: देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ही योजना आहे. या वर्षी मे महिन्यात पंतप्रधान मोदी यांनी आपल्या सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हिमाचल प्रदेशात झालेल्या एका विशेष कार्यक्रमात पीएम किसान सम्मान निधिीयोजनेच्या ११ व्या हत्या अंतर्गत १२ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात २१ हजार कोटी रुपये जमा केले होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com