
Jalgaon Ration Shop News : रेशन दुकानदारांनी ई-पॉस मशिन (E-POS Machine) बंद ठेवून ७, ८ व ९ फेब्रुवारीला धान्य वितरण (Ration Grain Supply) थांबवावे, असा प्रस्ताव अखिल महाराष्ट्र सरकारमान्य रेशन दुकान परवानाधारक महासंघाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मंजूर करण्यात आला.
मात्र, त्याला दुकानदारांनी प्रतिसाद न देता अनेक रेशन दुकानदार ई-पॉस मशिनद्वारे थम घेऊन धान्य वितरण करताना दिसून आले. यामुळे रेशनकार्डधारकांची गैरसोय टळली आहे.
राज्यातील रेशन दुकानदारांचे अनेक प्रलंबित प्रश्न, दुकानदारास मिळणाऱ्या कमिशनमध्ये वाढ, मोफत वाटप केलेल्या धान्याचे कमिशन, देशातील काही राज्यांत रेशन दुकानदारास मिळणारे मानधन महाराष्ट्रातही मंजूर करावे, वर्ल्ड फूड प्रोग्राममध्ये रेशन दुकान परवानाधारकास समाविष्ट करावे, रेशन दुकानदारास वाहतूक ठेकेदाराकडून पूर्ण वजनाचे धान्य मिळावे.
आदी मागण्यांबाबत मंगळवार (ता. ७)पासून ९ फेब्रुवारीपर्यंत ई-पॉस मशिन बंद ठेवून धान्य वितरण बंद ठेवण्यात येणार होते.
ई-पॉस मशिन बंद ठेवून कार्डधारकांना धान्य न देता परत पाठविण्याचे ठरविले होते. मात्र, अनेक दुकानांनी ई-पॉस मशिनद्वारेच अनेक कार्डधारकांना धान्याचे सुरळीतपणे वितरण केले.
राज्याच्या आधार इनब्लड पब्लिक डिस्ट्रीबुश्यन सिस्टिम प्रणालीवर दुपारी दोनपर्यंत एकूण राज्यभरात ३४ हजार ४७८ ई-पॉस मशिनद्वारे धान्य दिल्याची नोंद होती. जळगाव जिल्ह्यात ४८० जणांना धान्य दिल्याची नोंद होती.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.