Grampnachayat Election : सरपंचपदासाठी ‘फिल्डिंग’ सुरू

मतदारयादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आल्यानंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. दिवाळीनंतर मुदत संपणाऱ्या २५६ ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीचे फटाके वाजणार आहेत.
Grampanchayat Election
Grampanchayat ElectionAgrowon

अमरावती : जिल्ह्यातील मुदत संपलेल्या २५६ ग्रामपंचायतींवर प्रशासक येणार की त्या ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका (Grampanchayat Election Amaravati) होणार, या बाबतचा संभ्रम आता जवळपास मिटला आहे. मतदारयादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आल्यानंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे.

Grampanchayat Election
Mustard Crop : महाराष्ट्रात मोहरी पीक घेता येईल का ? | ॲग्रोवन

दिवाळीनंतर मुदत संपणाऱ्या २५६ ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीचे फटाके वाजणार आहेत. विशेष म्हणजे थेट सरपंचांची निवड होणार असल्याने या पदासाठी इच्छुक आतापासूनच कामाला लागले आहेत. मागील आठवड्यात ग्रामविकास विभागाकडून निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर न केल्याने ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या २५६ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या.

मात्र ४ ऑक्टोबरला लगेच राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार १३ ऑक्टोबरला संपूर्ण ग्रामपंचायतींच्या प्रभाग निहाय प्रारूप मतदारयादी जाहीर केली जाणार आहे. १३ ते १८ ऑक्टोबरपर्यंत आक्षेप व सूचना स्वीकारल्या जातील.

तसेच २१ ऑक्टोबरला संपूर्ण ग्रामपंचायतींची सुधारित मतदारयादी जाहीर केली जाणार आहे. जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील २५६ पैकी ११३ ग्रामपंचायतीची मुदत नोव्हेंबरमध्ये तर १४३ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ डिसेंबरमध्ये संपणार आहे.

संभ्रम मिटला, निवडणुका होणारच

आधी ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्तीबाबतचे निर्देश देण्यात आले होते. त्यामुळे इच्छुकांमध्ये नाराजी पसरली होती, मात्र चारच दिवसांनी निवडणूक आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यामुळे आता संभ्रम मिटला असून, दिवाळीच्या दरम्यान निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.

राज्याच्या घडामोडींचे पडसाद

राज्यातील सत्तांतरानंतर राजकारणाचे वारेसुद्धा बदलले आहे. विविध राजकीय पक्षांसोबतच स्थानिक गटांची मंडळीसुद्धा आतापासून सक्रिय झाली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींचे पडसाद स्थानिक स्तरावर सुद्धा पाहायला मिळणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com