सांगोल्यातील पंधरा गावाच्या शेतीच्या पाण्याची चिंता मिटली

बुद्धेहाळ मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो़; रब्बीसह उन्हाळी, खरीपाला फायदा
Buddhehaal Projeact
Buddhehaal ProjeactAgrowon


अॅग्रोवन वृत्तसेवा
सोलापूर ः परतीच्या पावसामुळे सांगोला तालुक्यातील बुद्धेहाळ मध्यम प्रकल्प (Buddhehaal Projeact) शंभर टक्के भरला आहे. सध्या हा प्रकल्प ओव्हरफ्लो (Overflow) झाल्याने मोठ्या प्रमाणात सांडव्यावरून पाणी वाहत आहे. या प्रकल्पामुळे सांगोला (Sangola) तालुक्यातील १५ गावातील ४ हजार २४१ हेक्टर क्षेत्रावरील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. सध्याच्या रब्बीसह पुढील उन्हाळी आणि खरीप हंगामातील पिकांना या पाण्याचा मोठा फायदा होणार आहे.


Buddhehaal Projeact
Cotton Production : देशात कापूस उत्पादकता सुधारण्याचे संकेत

यंदा सुरवातीपासूनच पावसाने सांगोला तालुक्यात तशी जेमतेम हजेरी लावली. पण त्यात सातत्य होते. त्याचा फायदा झालाच, पण ऑक्टोबरमध्ये परतीच्या पावसाने चांगलाच जोर लावला. त्यामुळे बुद्देहाळ मध्यम प्रकल्पात क्षमतेएवढे सुमारे ६७२ दशलक्षघनफूट पाणी साठले. आता तर धरण ओव्हरफ्लो झाले आहे. पावसाच्या या हजेरीमुळे तालुक्यातील जुनोनी, यमाई तलाव, चिंचोली तलाव, घेरडी-पारे, हंगिरगे, अचकदाणी हे प्रमुख तलावही आता पूर्ण क्षमतेने भरले आहेत. गेल्या वर्षीही धरणाने पूर्ण क्षमतेची पातळी गाठली होती. यंदाही पुन्हा सलग दुसऱ्यावर्षी धरणाची स्थिती ओव्हरफ्लोमध्ये आहे. या पाण्यामुळे शेतीच्या पाण्याला फायदा होणार आहेच, पण त्याशिवाय तलावाच्या लाभक्षेत्राखाली येणारय़ा काही गावांच्या पिण्याच्या पाण्याचीही सोय होणार आहे.

Buddhehaal Projeact
Soybean Rate : सोयाबीनला काय दर मिळतोय ?

चार हजार २४१ हेक्टरला फायदा
सांगोला तालुक्यातील बुद्धेहाळ मध्यम प्रकल्प लाभक्षेत्रात जलाशयातील उपशावर गौडवाडी, सोमेवाडी, बुद्धेहाळ, करांडेवाडी तर कालव्यावर बुद्धेहाळ, हातीद, पाचेगाव खुर्द, उदनवाडी, झापाचीवाडी, सरगरवाडी, चोपडी, बलवडी, नाझरे आणि माडगूळ या गावातील सुमारे ४ हजार २४१ हेक्टरला या पाण्याचा लाभ होणार आहे

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com