
Junnar Leopard News : जुन्नर शहर परिसरात नागरी वस्तीत संचार करणारा पाचवा बिबट्या (Leopard) गुरुवारी (ता. ९) जेरबंद करण्यात वन विभागाला (Forest Department) यश आले आहे.
जुन्नर तालुक्यात बिबट्यांच्या समस्येने उग्र रूप धारण केले असून, समस्येच्या प्रारंभी केवळ शेतशिवारात आढळणारा बिबट्या (Leopard Terror) आता थेट शहरीभागातील मानवी वस्तीमध्ये आढळत असल्याने शेतकरी नागरिक चिंताग्रस्त झाले आहे.
जुन्नर शहरातील आगरपेठ येथे नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यांत एकाच ठिकाणी तीन बिबटे जेरबंद करण्यात आले होते. त्यानंतर कल्याण पेठेतील नागरी वस्तीतील चौथा बिबट्या जेरबंद झाला.
गेल्या काही दिवसांपासून आगरपेठ येथे पुन्हा बिबट्याचा वावर वाढला होता. त्यास पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता.
ऊसतोड झाल्यानंतर लपण न राहिल्याने बिबट्यांनी जुन्नर शहरालगत असलेल्या शेती व नदी-नाल्यांच्या झुडपात मुक्काम ठोकला असल्याचे दिसून येत आहे. याभागात बिबट्याचा वावर असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
बिबट्या दिवसा शेतात फिरत असताना दिसतो तर रात्रीच्या वेळी बिबट्याच्या डरकाळ्या कानी पडतात. आगर पेठ येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात पूर्ण वाढ झालेला नर बिबट्या असून, त्यास माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात पाठविण्यात आले असल्याचे जुन्नरचे वनपरिमंडळ अधिकारी नितीन विधाटे यांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.