Rabbi Season : रब्बीच्या क्षेत्रात पन्नास टक्के वाढ अपेक्षित

जळगाव जिल्ह्यातील परिस्थिती; चांगल्या पावसाचा परिणाम
Rabbi Season
Rabbi SeasonAgrowon

ॲग्रोवन  वृत्तसेवा
जळगाव ः गेल्या वर्षी हरभऱ्याला (Chana) चांगला दर मिळाला होता. यंदा १०९ टक्के पाऊस झाला आहे. सिंचन प्रकल्पात (Irrigation Project) ९९ टक्के पाणी आहे. यामुळे रब्बीची पेरणी (Rabbi Sowing) यंदा तीन लाखांपेक्षा अधिक हेक्टरवर होईल, असा दावा कृषी विभागाने (Agriculture Department) केला आहे. गेल्या वर्षी हरभऱ्याला चार हजारांचा, तर ज्वारीला तीन हजारांवर दर मिळाला होता. यामुळे यंदा हरभरा, दादरचा पेरा अधिक होणार आहे.

Rabbi Season
Cotton Rate: कापसातील मंदी किती दिवस टिकेल ? | Agrowon | ॲग्रोवन

रब्बीच्या पेरणीस सुरवात झाली असून, पंधरा हजारांपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरण्या झालेल्या आहेत.जसजशी जमिनीतील ओल कमी होईल त्या प्रमाणात रब्बीच्या पेरण्यांना वेग येणार आहे.
खरिपाचा हंगाम आता पूर्ण होत आला आहे. परतीच्या पावसाने तब्बल महिनाभर उशिराने शेतकऱ्यांना पेरण्या कराव्या लागत आहेत. हरभऱ्याला गेल्या हंगामात चार हजारांचा दर मिळाला होता. उत्पादनही एकरी दहा क्विंटल आले होते. ज्वारीलाही तीन हजार ते तीन हजार दोनशे असा दर मिळाला होता. यामुळे हरभरा, ज्वारीचा अधिक पेरा करण्याच्या तयारीत शेतकरी आहेत.

Rabbi Season
Soybean Rate : केंद्राने सोयाबीनवरील स्टाॅक लिमिट काढले | Agrowon

गव्हाला अधिक पाणी लागते. त्यामुळे आपल्या परिसरात गव्हाचा पेरा कमी होतो. त्याखालोखाल मक्याचा पेरा होतो. यंदा हरभऱ्याला हमीभाव पाच हजार ३००, तर गव्हाला दोन हजार ६०० दर जाहीर झाला आहे. ज्वारीलाही चांगला दर मिळण्याची अपेक्षा आहे. सोबतच चारा म्हणूनही पीक कापणीनंतर ज्वारीचा उपयोग करता येतो. सिंचन प्रकल्पात चांगला पाणीसाठा असल्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे.

चांगल्या पावसाने रब्बीचा फायदा होणार आहे. सरासरी दोन हेक्टरवर रब्बीचा पेरा होता. त्यात यंदा एक लाख हेक्टर पेरा वाढेल. हरभरा, ज्वारी पिकांचा पेरा सर्वाधिक असेल. गेल्या वर्षीपेक्षा यंदा हमीभाव या पिकांना अधिक मिळाला आहे.
- संभाजी ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या कापसाचे मोठे
नुकसान केले आहे. आता रब्बीवर मदार आहे. ज्वारी, हरभऱ्याची पेरणी सुरू झाली आहे. थंडीचा कडाका वाढेल अशी आशा आहे. शेतात ऑक्टोबर महिन्यात ओल असल्याने रब्बीची पेरणी करता आली नाही. त्यामुळे आता पेरणीस सुरुवात होईल.
- गणेश पाटील, शेतकरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com