
धुळे ः शिंदखेडा तालुक्यात दहा गावांत स्वतंत्र मंडळ अधिकारी कार्यालये, तर तब्बल ५० गावांत स्वतंत्र तलाठी कार्यालये (Talathi Office) नाहीत. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांनी दहा गावांतील मंडळ अधिकारी कार्यालय व निवासस्थान तसेच ५० गावांत स्वतंत्र तलाठी कार्यालयांच्या बांधकामासाठी १९ कोटी रुपये निधीची गरज असल्याचे नमूद करत हा निधी मंजूर करावा, अशी मागणी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे केली.
शिंदखेडा तालुक्यातील मंडळ अधिकारी व तलाठी यांची कार्यालये नाहीत. ग्रामपंचायत अथवा खासगी जागेत ही कार्यालये सुरू आहेत. त्यांची स्वतंत्र कार्यालये गरजेची आहेत, जेणेकरून तलाठी वेळेवर जनतेला उपलब्ध होतील. त्यामुळे प्रत्येक सजाच्या ठिकाणी कार्यालय बांधण्यासाठी प्रस्ताव सादर केला असून, त्याला मंजुरी द्यावी, अशी मागणी आमदार रावल यांनी केली.
शिंदखेडा, दोंडाईचा, चिमठाणे, वर्शी, विरदेल, खलाणे, नरडाणा, बेटावद, विखरण, शेवाळे या ठिकाणी मंडळ अधिकारी कार्यालय बांधकामासाठी तीन कोटी ९९ लाख रुपये निधीची मागणी आमदार रावल यांनी केली आहे.
या गावांना तलाठी कार्यालये
मालपूर, रामी, टाकरखेडा, निमगूळ, झोटवाडे, कुरकवाडे, बाह्मणे, कोडदे, खर्दे बुद्रुक, दाऊळ, हातनूर, कर्ले, देगाव मेथी, दिवी, दभाषी, होळ, वायपूर, चिरणे, महाळपूर, वालखेडा, अजंदे बुद्रुक, पढावद, मुडावद, म्हळसर, अमळथे, लोहगाव, तामथरे, दराणे, सवाई मुकटी, डांगुर्णे, पाटण, वरपाडे, वरसूस, वरूळ, भडणे, आरावे, कंचनपूर, वाघाडी, वारूड, गोराणे, कमखेडा, जातोडे, पाष्टे, चिलाणे, रंजाणे, चौगाव बुद्रुक, सुकवद, दत्ताणे व डाबली-धांदरणे अशा ५० गावांना तलाठी कार्यालयांची मागणी करण्यात आली आहे.
या कार्यालयांच्या बांधकामासाठी प्रत्येकी ३० लाख रुपये याप्रमाणे १५ कोटी रुपये निधीची आवश्यकता असून, हा निधी मंजूर करावा, अशी मागणी आमदार रावल यांनी महसूलमंत्री विखे-पाटील यांच्याकडे केली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.