Fig Season : परतीच्‍या पावसामुळे अंजिराचा हंगाम लांबणीवर

‘एपीएमसी’त एका गाडीची आवक, भाव वधारले
Fig Season
Fig SeasonAgrowon

डोंबिवली, वाशी : मुंबई कृषी उत्पन्न फळ बाजारात (Mumbai APMC) सध्या सफरचंद, डाळिंब आणि सीताफळ या फळांचा हंगाम (Fruit Season) सुरू आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये अंजीर बाजारात दाखल होण्यास सुरुवात होते, मात्र सततच्या पावसाने अंजीरच्या उत्पादनाला (Fig Production) फटका बसला असल्याने हंगामाला १५ दिवसांनी सुरुवात होईल, अशी शक्यता व्यापारी वर्तवत आहेत.

Fig Season
Fig Crop Disease : अंजिरातील एकात्मिक रोगनियंत्रण

उत्‍पादनावर मोठा परिणाम होणार

डोंबिवली : सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून ते ऑक्टोबरच्या सुरुवातीस अंजीर फळ हा बाजारात दाखल होते. मात्र, सततच्या परतीच्या पावसामुळे अंजीर फळाच्या उत्पादनाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. गेल्या कित्येक दिवसापासून ऊन-पावसाचा खेळ सुरू असल्‍याने वातावरणामध्ये बदल होतो. त्याचा परिणाम हा अंजिर फळाच्या उत्पादनावर झाला आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत अंजिराची आवक वाढण्यास सुरुवात होईल, असे विक्रेता लकी मेहता यांनी सांगितले.

१ पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथून आवक होत असून सध्या बाजारात अवघी एक गाडी दाखल होत आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरअखेर- नोव्हेंबर सुरुवातीपासूनच १४ क्विंटलपर्यंत अंजीर बाजारात दाखल झाले होते. यंदा, मात्र एकच गाडी दाखल होत आहे. अवकाळी पावसाने सुरुवातीच्या छाटणीला आलेल्या अंजीरला फटका बसला आहे.

२ फळ परिपक्व होण्यास उशीर झाला आहे आणि त्यामुळे बाजारात अल्प प्रमाणात आवक होत असल्याचे मत घाऊक फळ व्यापारी व्यक्त करीत आहेत. काही दिवसांत वातावरणात उष्ण-दमट हवामान असल्याने अंजीरला आवश्यक वातावरण नसल्यामुळे यंदा बाजारात दाखल होण्यास विलंब होणार आहे.

पावसाचा सतत मारा झाल्याने अतिरिक्त पाण्यामुळे अंजीर खराब झाले आहे. नोव्हेंबर ते १५ फेब्रुवारीपर्यंत अंजीरचे हंगाम असून १० नोव्हेंबरनंतर अंजिराची आवक वाढण्यास सुरुवात होईल. सध्या बाजारात एक गाडी दाखल होत असून ४० नगाला ३०० ते ४५० रुपये बाजारभाव आहे.

- संजय पिंपळे, व्यापारी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com