मागण्या मान्य होईपर्यंत लढा सुरू ठेवा

राज्यामध्ये आजपर्यंतच्या सर्व शासनाने ऊसतोड कामगारांची फसवणूकच केली आहे. ऊसतोड मजुरांच्या मागण्यांसाठी संघटित लढ्याशिवाय पर्याय नाही.
Sugarcane
SugarcaneAgrowon

माजलगाव, जि. बीड : राज्यामध्ये आजपर्यंतच्या सर्व शासनाने ऊसतोड कामगारांची (Sugarcane Labour) फसवणूकच केली आहे. ऊसतोड मजुरांच्या मागण्यांसाठी (Sugarcane Labourer) संघटित लढ्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे मागण्या मान्य होईपर्यंत लढा सुरू ठेवा, असे आवाहन ऊसतोड व वाहतूक कामगार संघटनेचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी केले.

Sugarcane
Sugar : सणांमुळे देशांतर्गत बाजारात साखरेला मागणी वाढली

शहरात आयोजित राज्यस्तरीय ऊसतोड कामगार परिषदेच्या उद्‌घाटन कार्यक्रमात बुधवारी (ता. २४) ते बोलत होते. व्यासपीठावर दत्ता डाके, एम. एच. शेख, सुभाष जाधव, आबासाहेब चौगुले, नामदेव राठोड, मोहन जाधव, अॅड. अजय बुरांडे, मारोती खंदारे, पांडुरंग राठोडी, मुसद्दीक बाबा, अशोक राठोड, मनीषा करपे, बी. जी. खाडे यांची उपस्थिती होती. मोहन जाधव यांनी कामगारांचा फक्त वोट बॅंक म्हणून वापर करतात असा आरोप केला.

Sugarcane
Sugar : साखरेच्या विक्रीत शंभर लाख टनांनी वाढ

परिषदेसाठी अॅड. सय्यद याकूब, सुदाम शिंदे, डॉ. अशोक थारोत, काशिराम सिरसट, सुहास झोडगे, गंगाधर पोटभरे, मुरलीधर नागरगोजे, बाळासाहेब चोले, अंगद खरात, संतोष जाधव, ओम पुरी, लहू खारगे, फारुक सय्यद, विजय राठोड, मीरा शिंदे, शिवाजी जाधव, मधुकर आडागळे, विनायक चव्हाण, शिवाजी कुरे, कृष्णा सोळंके, गणेश राठोड, सुहास जायभाये, सुभाष डाके, गजानन जाधव, प्रशांत मस्के, जगदीश फरताडे, शांतिलाल पट्टेकर यांनी पुढाकार घेतला.

परिषदेत घेतलेले ठराव

२० सप्टेंबरला पुण्यातील साखर आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन.

गोपिनाथराव मुंडे ऊसतोड कल्याणकारी महामंडळाची प्रभावी अंमलबजावणी करा.

कामगारांची नोंदणी करा, कामगारांना प्रत्यक्ष लाभ द्या.

महागाईच्या प्रमाणात मुकादमाचे कमिशन व पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या प्रमाणात दर वाढवा.

ऊसतोडणी कामगारांसाठी घरकुल योजना सुरू करा.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com