किरीट सोमय्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा

शिवसेनेचे आंदोलन; भाजपा विरोधात घोषणाबाजी
Kirit Somaiya
Kirit Somaiya Agrowon

यवतमाळ : भाजपचे (BJP) माजी खासदार किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी २०१३ साली आयएनएस विक्रांत (INS Vikrant) वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी गोळा केला होता. या रकमेतून युद्धनौकेचे स्मारक बनवण्यासाठी निधी राजभवन येथे जमा करणे आवश्यक होते. माहितीच्या अधिकार कार्यकर्त्यांना मिळालेल्या उत्तरातून त्यांनी ही रक्कम जमा केलेली नाही. हा नुसताच घोटाळा (Scam) नसून देशद्रोह असून सोमय्यावर देशद्रोहाचा (Treason) गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेने (Shivsena) केली. यासाठी गुरुवारी (ता.७) स्थानिक दत्त चौकात आंदोलन केले.

Kirit Somaiya
शेतीमालाचा वायदेबाजारः कापूस, हळदीच्या किमतींत वाढ

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी आयएनएस विक्रांत किरीट सोमय्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा
नौकेचे स्मारक तयार करण्यासाठी निधी गोळा केला होता. त्यांनी जमा केलेला निधी राजभवन येथे पोहोचला का, अशी माहिती माहिती अधिकारात मागण्यात आली होती. राजभवन येथे असा निधी जमा झाला नसल्याचे माहितीच्या अधिकार कार्यकर्त्यांना मिळालेल्या उत्तरातून समोर आली आहे. त्यामुळे शिवसेना (Shivsena Worker) आक्रमक झाली आहे. सोमय्या यांनी नुसता घोटाळाच केला नसून देशद्रोह केला असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला.

सोमय्या यांच्यावर देशद्रोहाचे (Treason) गुन्हे (Crime) दाखल करा, या मागणीसाठी शिवसेना आक्रमक झाली. दत्त चौकात निदर्शने करीत भाजप (BJP) विरोधात घोषणाबाजी केली. या वेळी जिल्हाप्रमुख पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड, संतोष ढवळे, प्रवीण पांडे, गजानन डोमाळे, किशोर इंगळे, संजय रंगे, नितीन बांगर, कविता इंगळे, सचिन राठोड, कांता कांबळे, अमोल धोपेकर, गिरीजानंद कळंबे, निमिषा पोपट यांचेसह पदाधिकारी, युवासेना व महिला आघाडीचे कार्येकर्ते उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com