Double Voting : दुबार मतदान करणाऱ्यांवर फौजदारी दाखल करा

लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांना इतर ठिकाणी मतदान करणारे मतदार ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तिसऱ्याच ठिकाणी मतदान करीत आहेत.
Voting
VotingAgrowon

बीड : लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांना इतर ठिकाणी मतदान (Election) करणारे मतदार ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये (Gram Panchayat Election) तिसऱ्याच ठिकाणी मतदान करीत आहेत. व्यापार आणि नोकरीसाठी इतर ठिकाणी वास्तव्यास असलेले आणि तेथील मतदार यादीत नाव असतानाही पुन्हा गावच्या निवडणुकीसाठी मतदान करणाऱ्या अशा दुबार मतदारांवर (Double voting ) फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते बळवंत चव्हाण यांनी केली.

Voting
Grampanchyat Election : यवतमाळ जिल्ह्यात १,८३५ उमेदवार रिंगणात

सुशिक्षित मतदारांना स्वतःची नावे दोन मतदार यादीत माहीत असतानाही वेगवेगळ्या निवडणुकीत वेगवेगळ्या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावणे म्हणजे निवडणूक आयोगाची फसवणूकच असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यात सुमारे ७०४ पैकी ६६६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी रविवारी (ता.१८) मतदान होणार आहे.

Voting
Election : सहा आठवड्यांत निवडणूक पूर्ण करा

ग्रामपंचायत निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर दुबार मतदार मतदानाचा हक्क बजावत आहेत. दुबार मतदानाचा हक्क बजावणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते बळवंत चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. अनेक कर्मचारी व व्यापारी विशिष्ट कालावधीसाठी गावात वास्तव्यास आहेत, त्यांच्याकडे कायम रहिवासी पुरावा नसतानाही हे लोक मतदानाचा हक्क वेगवेगळ्या निवडणुकीत वेगवेगळ्या ठिकाणी बजावताना दिसतात.

अनेकांची दुबार नावे मतदार यादीत असतानाही असे लोक मतदानाचा हक्क बजावणार असतील तर त्यांच्या विरुद्ध कायद्यातील तरतुदीनुसार फौजदारी गुन्हे निवडणूक अधिकाऱ्यांनी दाखल करावेत अशी मागणी बळवंत चव्हाण यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com