Sugarcane FRP : कारखानदारांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करा ः नलावडे

साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने निश्चित केलेल्या दराची प्रसिद्धी हंगाम सुरू करण्यापूर्वी करणे कायद्याने बंधनकारक
Sugarcane FRP
Sugarcane FRPAgrowon

कऱ्हाड ः साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने निश्चित केलेल्या दराची प्रसिद्धी हंगाम सुरू करण्यापूर्वी करणे कायद्याने बंधनकारक आहे; मात्र कऱ्हाड (जि. सातारा) तालुक्यातील रयत अथनी शुगरनेच ऊसदर जाहीर केला आहे.

अन्य साखर कारखान्यांनी तो केलेला नाही. त्यामुळे शासन निर्णयाचे उल्लंघन करणाऱ्या साखर कारखान्याच्या प्रशासनावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावे, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलावडे यांनी पोलिस उपाधीक्षकांकडे निवेदनाव्दारे केली आहे.

निवेदनातील माहिती अशी ः शासन निर्णय क्रमांक पाच मध्ये साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने निश्चित केलेल्या दराची प्रसिद्धी हंगाम सुरू करण्यापूर्वी जास्त खप असलेल्या दोन स्थानिक वर्तमानपत्रात व कारखाना स्थळावर माहितीसाठी प्रसिद्ध करणे बंधनकारक राहील, असे नमूद केले आहे; मात्र कऱ्हाड तालुक्यातील केवळ रयत अथनी शुगरनेच या वर्षीचा ऊस दर जाहीर केला आहे.

तालुक्यातील अन्य कारखान्यांनी अद्याप आपला दर जाहीर केलेला नाही. साखर कारखाने शासन निर्णयातील आपल्या फायदयाच्या निर्णयाची मात्र तंतोतंत अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना कमीत कमी ऊस दर देतात. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कारखानदारांवर शेतकरी सभासंदांचा विश्वासघात केल्याबद्दल फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत.

Sugarcane FRP
Farmer Loan : तेवीस हजार शेतकरी सावकाराच्या दारी

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com