‘गिरणा’ भरल्याने रब्बीला होणार लाभ

गिरणा धरण या वर्षीदेखील शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. यामुळे जिल्ह्यातील सुमारे २१ हजार हेक्टरला रब्बी हंगामात लाभ होईल.
Girna Dam
Girna DamAgrowon

मेहुणबारे, जि. जळगाव ः गिरणा धरण (Girna Dam) या वर्षीदेखील शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. यामुळे जिल्ह्यातील सुमारे २१ हजार हेक्टरला रब्बी हंगामात (Rabi Season) लाभ होईल. तसेच नाशिकमधील मालेगाव, नांदगाव व जळगावमधील चाळीसगाव व दहिवाळ या चार पाणी योजनांसह जिल्ह्यातील १२९ पाणीपुरवठा योजनांचा (Water Supply Scheme) पाण्याचा प्रश्‍न मिटला आहे. गिरणा धरण ९२.३३ टक्क्यांवर स्थिर आहे.

Girna Dam
‘हतनूर’चे वाहून जाणारे पाणी ओझरखेडा धरणात सोडा

त्यातून विसर्ग सुरूच आहे. अर्थात, ते १०० टक्के भरेल. यंदा अनेक वर्षांनंतर धरणातून प्रथमच सलग दीड महिने विसर्ग सुरू आहे. यामुळे गिरणा पट्ट्यात आनंद आहे. जळगाव जिल्ह्यासह नाशिक जिल्ह्याला वरदान ठरलेले गिरणा धरण जलसंजीवनी ठरले आहे. गिरणा धरणातून मालेगाव, नांदगाव, चाळीसगाव व दहिवाळ या गावांना जलवाहिनीद्वारे थेट पाणीपुरवठा होतो तर चाळीसगाव एमआयडीसीसह बेलगंगा कारखान्याला जामदा बंधाऱ्यावरून पाणीपुरवठा होतो. तर चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल, जळगाव आदी तालुक्यांतील सुमारे १२९ ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजना गिरणावर अवलंबून आहेत. यंदा जुलैमध्ये गिरणा धरणाने नव्वदी पार केली.

Girna Dam
‘जायकवाडी’तून विसर्ग वाढविला

नाशिक जिल्ह्यात गिरणा धरणाच्या उगम क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे गेल्या ५७ वर्षात पहिल्यांदाच गिरणा धरणात जुलै, ऑगस्टमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा निर्माण झाला. गिरणेचे पाणी जळगाव जिल्ह्यातील सुमारे ५० हजार हेक्टर शेती ओलिताखाली आणते. तर वर्षाला सिंचन व पिण्याचे पाणी मिळून किमान पाच आवर्तने सोडण्यात येतात. त्यामुळे पुढील वर्षभर तरी गिरणेवर अवलंबून असलेल्यांना पाण्याची टंचाई भासणार नाही. त्याचबरोबर यंदाही जिल्ह्यात रब्बीचा हंगाम बहरेल, यात शंकाच नाही.

पावसाने ताण दिल्याने चिंता

जिल्ह्याला वरदान ठरलेले गिरणा धरण भरल्याने सिंचनासह पिण्याचा प्रश्‍न आजच मिटल्यासारखा असताना दुसरीकडे मात्र चाळीसगाव तालुक्यात कोरड्या दुष्काळाचे भीषण सावट उभे ठाकले आहे. गेल्या १५ ते २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके कोमजली आहेत. पाऊस लांबल्यास खरीप हंगाम पुरता वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. पावसाच्या तीन महिन्यांत नदी-नाले वाहणारा पाऊसच झाला नसल्याने चाळीसगाव तालुक्यातील लघू प्रकल्पांमधील पाणीसाठा जेमतेमच आहे. १५ लघू प्रकल्पांपैकी केवळ ४ प्रकल्पच १०० टक्के भरले असून, उर्वरित प्रकल्पांमध्ये चिंताजनक जलसाठा आहे. या आठ दिवसांत जर दमदार पाऊस झाला नाही तर या लघू प्रकल्पांवर अवलंबून असलेल्या शेतीला रब्बीचा मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com