
Solapur News अनेक वर्षे केवळ कागदोपत्री असणाऱ्या जिल्ह्यातील सहकारी संस्थांचा शोध सहकार विभागाच्या (Cooperative Department) वतीने घेण्यात आला आहे. अशा पद्धतीच्या १९१ सहकारी संस्था असल्याचे सहकार विभागाच्या सर्व्हेक्षणात आढळले आहे.
आता या संस्था कोणत्याही प्रकारे कार्यरत नसल्याने अवसायनात काढण्यासाठी जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी अंतिम आदेशाच्या नोटिसा या संस्थांना बजावल्या आहेत.
सहकारी संस्थांच्या सर्व्हेक्षणात बंद असलेल्या संस्थांची माहिती संकलित करण्यात आली. ज्या सहकारी संस्था लेखापरीक्षण करून घेत नाहीत, ज्या संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुका होत नाहीत, अशा ३१९ सहकारी संस्था अवसायनात घेण्यात आल्या आहेत. त्यापैकी आता १९१ संस्थांच्या अवसायनाची अंतिम प्रक्रिया सुरू आहे.
त्यात दक्षिण सोलापूर तालुक्यातील दहा सहकारी संस्थांना अवसायनातील अंतिम आदेश देण्यात आला आहे. या संस्थांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यात आली आहे. तर उर्वरित संस्थांना अंतरिम अवसायनाची नोटीस बजावण्यात आली आहे.
या संस्थांकडून खुलासा मागवण्यात आला आहे. त्यांच्याकडून समाधानकारक खुलासा न आल्यास या संस्था थेट अंतिम अवसायनात घेण्याची कार्यवाही होईल, असे सांगण्यात आले.
सहकारी संस्थांनी लेखापरीक्षण व संचालक मंडळाच्या निवडणुका घेणे आवश्यक आहे. पण या संस्थांनी नोंदणी करून घेतल्यानंतर काहीच केलेले नाही. त्यामुळे ही कारवाई आता केली जाईल.
- किरण गायकवाड, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था), सोलापूर
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.