पुणे जिल्हा बँकेच्या वतीने आर्थिक साक्षरता अभियान

या अभियानाच्या माध्यमातून खळद (ता. पुरंदर) येथे सोमवारी (ता. ८) शिवरी शाखेच्या वतीने महिलांसाठी आर्थिक साक्षरता अभियान प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महिलांची नवीन बचत खाती उघडून त्यांना २ लाख विम्याचा लाभ, एटीएम कार्ड व बँकेच्या अन्य योजना याबाबत माहिती देऊन जागृती करण्यात आली.
PDCC Bank
PDCC BankAgrowon

खळद, ता. पुरंदर ः नाबार्ड (NABARD) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (PDCC Bank) व यशवंतराव चव्हाण सेंटर (Yashwantrao Chavan Center) मुंबई यांच्या वतीने ग्रामीण भागातील शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक व युवक-युवतींची वैयक्तिक व कौटुंबिक उद्दिष्टे पूर्ण होण्यासाठी व त्यांना आर्थिक बाबींविषयी ज्ञान व कौशल्य मिळून त्या परिपूर्ण व्हाव्यात या हेतूने गावोगावी जाऊन आर्थिक व डिजिटल साक्षरता अभियान (Financial And Digital Literacy Campaign) सुरू करण्यात आले आहे. या अभियानाच्या माध्यमातून खळद (ता. पुरंदर) येथे सोमवारी (ता. ८) शिवरी शाखेच्या वतीने महिलांसाठी आर्थिक साक्षरता अभियान प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महिलांची नवीन बचत खाती उघडून त्यांना २ लाख विम्याचा लाभ, एटीएम कार्ड व बँकेच्या अन्य योजना याबाबत माहिती देऊन जागृती करण्यात आली.

PDCC Bank
Banking: मूठभर महाकाय बॅँकांकडे वाटचाल

या वेळी बँकेचे पुरंदर तालुका विभागीय अधिकारी महेश खैरे, आर्थिक साक्षरता अभियान तालुकाप्रमुख जयदीप निकुडे, शिवरी शाखा अधिकारी शिल्पा बोरकर, अमरसिंह देशमुख, पल्लवी जगताप, संजय जगताप आदी उपस्थित होते.

PDCC Bank
Soybean: सोयाबीनवर पिवळा मोझॅक रोग पडलाय का ?

डिजिटल युगामध्ये ग्रामीण भागातील बहुतांश महिलांना बँकेचे व्यवहार कसे करायचे याविषयीही ज्ञान नाही याचा विचार करून महिला डिजिटल साक्षर व्हाव्यात त्यांना बँकेविषयी सखोल ज्ञान होईल, त्यांच्याकडून आर्थिक बचत होईल व या बचतीतूनच भविष्यात व्यवसाय वाढीसाठी त्यांना पाठबळ मिळेल या हेतूने बारामती मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे व बँकेचे संचालक आमदार संजय जगताप यांच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक गावोगावी हा उपक्रम राबविला जात असल्याचे जयदीप निकुडे यांनी सांगितले.

तर अनेक कुटुंबांत घरातील कर्ता पुरुष बँकेत येतात, परंतु महिला मात्र बँकेपासून दूर राहतात अशा वेळी महिला स्वतःच्या पायावरती उभ्या राहाव्यात, त्यांनी बँकेत बचत करावी, एटीएम सहऑनलाइन बँकिंग याची माहिती करून घ्यावी या हेतूने हा उपक्रम स्तुत्य असल्याचे महेश खैरे यांनी सांगितले. याचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिल्पा बोरकर यांनी केले, तर आभार पल्लवी जगताप यांनी मानले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com