Agriculture Graduate : ‘कृषी पदवीधर’चे पहिले अधिवेशन अमरावतीत

राज्यातील कृषी पदवीधरांना संघटित करून त्यांच्या माध्यमातून कृषी विकासाला गती देण्याचा प्रयत्न केला जाईल.
Sharad Pawar
Sharad PawarAgrowon

Amravati News : राज्यातील कृषी पदवीधरांना संघटित करून त्यांच्या माध्यमातून कृषी विकासाला गती देण्याचा प्रयत्न केला जाईल. त्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुढाकार घेण्यात आला आहे.

या संदर्भात स्थापन ॲग्रिकल्चर फोरमचे राज्यातील पहिले अधिवेशन आज (ता.२३) अमरावती येथील हॉटेल गौरी ईन मध्ये होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) या वेळी मार्गदर्शन करतील.

Sharad Pawar
Sharad Pawar : शेतकऱ्यांच्या संधी उद्ध्वस्त करणे हेच सरकारचे धोरण

कृषी पदवीधर शेतकरी कुटुंबातील असतानाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. त्यावर नियंत्रणासाठी प्रगत आणि आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्या माध्यमातून उत्पादकता व उत्पन्न वाढ होत शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळेल, अशी अपेक्षा आहे.

Sharad Pawar
Sharad Pawar On Ajit Pawar : 'मी काय सांगतो ते महत्त्वाचं' ; अजित पवारांविषयीच्या चर्चांना शरद पवारांचा पूर्णविराम?

त्याकरिता कृषी विस्तारासाठी कृषी पदवीधरांच्या ज्ञानाचा उपयोग केला जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत महात्मा फुले ॲग्रिकल्चर फोरमची स्थापना त्यासाठी करण्यात आली आहे. राज्यातील कृषी पदवीधारकांचे हे संघटन राहील. या अंतर्गत कृषी क्षेत्रातील शेतकरी, संशोधक, कष्टकरी, मजूरांना मार्गदर्शन व मदत केली जाईल.

अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार, ‘राष्ट्रवादी’चे नेते छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, अनिल देशमुख, राजेश टोपे, राजेंद्र शिंदे, माजी कृषी आयुक्त प्रभाकर देशमुख, राज्य समन्वयक मनोहर चंद्रिकापुरे, डॉ. सी.डी. मायी आदी उपस्थित राहतील.

...अशी आहेत फोरमची उद्दिष्टे

- शेती कामासाठी ‘मनरेगा’द्वारे कुशल मनुष्यबळ उपलब्ध करणे

- हंगामात निविष्ठांची वेळेवर उपलब्धता करणे

- सिंचनाच्या सोयी सुविधा पुरविणे

- कृषी मालावर प्रक्रिया

- शेतीमालाला हमीभाव मिळवून देणे

कृषी पदवीधरांची राज्यस्तरीय संघटना असावी, या साठी गेल्या सात वर्षांपासून माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या मान्यतेनंतरच ॲग्रिकल्चर फोरम अस्तित्वात आले आहे. फोरमचे पहिले अधिवेशन अमरावती येथे होईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने राज्यातील विविध विभागांत अधिवेशन होईल. शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान नेण्याचा प्रयत्न याद्वारे केला जाईल.
- सुधीर राऊत (पाटील) संस्थापक अध्यक्ष, महात्मा फुले ॲग्रिकल्चर फोरम.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com