Agriculture Irrigation : शेतीसाठी खडकवासला धरणातून पहिले आवर्तन सुरू

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणांत एकूण सध्या १८.७४ टीएमसी म्हणजेच ६४.२७ टक्के पाणीसाठा आहे.
Agriculture Irrigation
Agriculture IrrigationAgrowon

Agriculture Irrigation News पुणे : उन्हाची तीव्रता (Temperature) वाढत असल्याने पूर्व भागातील शेतकऱ्यांकडून पाण्याची मागणी (Water Demand) वाढू लागली आहे. खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातून ग्रामीण भागातील शेतीसाठी (Irrigation) पहिल्या उन्हाळी आवर्तनाला बुधवारपासून (ता.१) सुरुवात करण्यात आली.

नवीन मुठा उजवा कालव्यातून हे आवर्तन देण्यात येत आहे. पुढील ५५ दिवस आवर्तन सुरू राहणार आहे. तब्बल पाच अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी देण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने केले आहे.

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणांत एकूण सध्या १८.७४ टीएमसी म्हणजेच ६४.२७ टक्के पाणीसाठा आहे.

पहिल्या उन्हाळी आवर्तनाद्वारे पाच टीएमसी आणि त्यानंतर उन्हाळ्यात धरणांतील उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेऊन दुसरे उन्हाळी आवर्तन देण्यात येणार आहे.

Agriculture Irrigation
Agriculture Irrigation : जलसंधारणातून कोरडवाहू शेतीला मिळाली शाश्वतता

खडकवासला धरणसाखळी प्रकल्पांत गेल्या वर्षीच्या तुलनेत ०.९३ टीएमसी पाणीसाठा अधिक आहे. गेल्या वर्षी २८ फेब्रुवारीपर्यंत चारही धरणांत १७.८१ टीएमसी म्हणजेच ६१.०९ टक्के पाणीसाठा शिल्लक होता.

यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र असल्याने धरणांमधील पाण्याचे बाष्पीभवन अधिक होण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यात शहरात आणि ग्रामीण भागात पाण्याची मागणी वाढते. त्यानुसार जलसंपदा विभागाकडून पाण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.

Agriculture Irrigation
Agriculture Irrigation : परभणी जिल्ह्यात सिंचन क्षेत्र वर्षांनुवर्षे कागदावरच

पुणे शहराला जवळपास चौदा टीएमसी पाणी पुरविले जाते. शहराची पाण्याची मागणी साडेसहा टीएमसीवरून चौदा टीएमसीपर्यंत गेली. आता पालिकेत २३ गावांचा समावेश झाल्याने शहराला आणखी पाणीसाठ्याची गरज लागणार आहे.

यानुसार महापालिकेने वाढीव पाणीसाठ्याची मागणीही पाटबंधारे विभागाकडे केली आहे. याबाबतचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे, असे खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी सांगितले.

पालकमंत्र्यांची मान्यता...

रब्बी हंगामासाठी २५ डिसेंबर ते ६ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत ३.८१ टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. आता उन्हाळ्यात दोन टप्प्यांत शेतीसाठी पाणी सोडण्याचे नियोजन आहे.

याकरिता कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष असलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून तत्त्वतः मान्यता घेण्यात आली आहे. त्यानुसार एक मार्चपासून पहिले उन्हाळी आवर्तन सुरू करण्यात आले आहे. दुसरे आवर्तनाचा नंतर विचार होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com