Energy Conservation : ऊर्जा संवर्धन, व्यवस्थापनात ‘पंदेकृवि’ला प्रथम पारितोषिक

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाद्वारे ऊर्जा संवर्धन आणि व्यवस्थापनासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक मिळाले आहे.
Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth | PDKV | Energy Conservation
Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth | PDKV | Energy ConservationAgrowon

अकोला ः महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाद्वारे ऊर्जा संवर्धन (Energy Conservation) आणि व्यवस्थापनासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला (PDKV) राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक मिळाले आहे. विद्यापीठ गटामध्ये सलग दुसऱ्या वर्षी हे प्रथम पारितोषिक मिळाले.

Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth | PDKV | Energy Conservation
PDKV Crop Verity : ‘पंदेकृवि’च्या तीन वाणांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता

‘मेडा’कडून याबाबत १७ व्या राज्यस्तरीय पुरस्काराकरिता अर्ज मागविण्यात आले होते. विद्यापीठ गटात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठास प्रथम पारितोषिक मिळाले. या प्रतियोगितेमध्ये विद्यापीठाकडून कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे यांनी कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनात सादरीकरण केले.

Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth | PDKV | Energy Conservation
PDKV : यंदाच्या ‘जॉईंट अॅग्रेस्को’त ‘पंदेकृवि’च्या ६३ शिफारशी

कृषी विद्यापीठात ऊर्जा संवर्धन व व्यवस्थापनात डॉ. काळबांडे यांनी पुढाकार घेऊन आतापर्यंत १९५ किलोवॉट ऊर्जा क्षमतेचा छतावरील वीज वाहक सोलर पी.व्ही. ऊर्जा प्रकल्प उभारला. या प्रकल्पाद्वारे २०२०-२१ या आर्थिक वर्षात विद्यापीठाची वीजबिलावरील वार्षिक बचत १७ लाखांपर्यंत झाली.

तसेच ४०० किलोवॉट ऊर्जा क्षमतेच्या छतावरील वीजवाहक सोलर पी. व्ही. ऊर्जा प्रकल्पाचे काम सुरू आहे. हा प्रकल्प कार्यरत झाल्यावर त्याद्वारे वार्षिक बचत ४५ लाख रुपये होईल, असा अंदाज आहे. इतरही युनिटच्या माध्यमातून काम सुरू आहे, अशी माहिती मिळाली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com