
गांधीनगर, जि. कोल्हापूर ः पंचगंगा नदी (Panchganga River) पात्रामध्ये वळिवडे (ता. करवीर) येथे मृत माशांचा (Dead Fish) खच पडला आहे. दोन दिवसांपासून पात्रात मृत मासे तरंगत आहेत. यामुळे परिसरात दुर्गंधी सुटली आहे. नदीतील मासे कोणत्या कारणामुळे मृत झाले आहेत, ते अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दोन दिवसांपासून मृत मासे तरंगत आहेत. नदीकाठावर मासेमारी करण्यासाठी आलेले लोक मासेमारी न करताच परत गेले. नदीकाठावर शेती, अंघोळ आणि इतर कारणासाठी येत असलेले लोक या दुर्गंधीमुळे त्रस्त झाले आहेत.
मागील तीन वर्षांपासून दरवर्षी मासे मृत होण्याचा प्रकार घडत आहे. नदीमध्ये धरणातील पाणी सोडले तर हे मृत मासे प्रवाहासोबत पुढे जातीलही; परंतु दरवर्षी होणाऱ्या या प्रकारामुळे मच्छीमार, नदीकाठावरील शेतकरी आणि ग्रामस्थ त्रस्त आहेत. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
बहुतांश ठिकाणी एकाच प्रकारचे मासे मेले आहेत. आज दिवसभरात वेगवेगळ्या ठिकाणचे पाण्याचे नमुने संकलित केले आहेत. मासे मृत होण्यास जबाबदार असणाऱ्या घटकांवर कडक कारवाई करण्यात येईल.
- जगन्नाथ साळुंखे, प्रादेशिक अधिकारी, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, कोल्हापूर.
दररोजच्या खर्चासाठी नदीचे पाणी वापरले जाते. नदीमध्ये मासे मेल्यामुळे पाणी प्रदूषित झाले आहेत. यामुळे पुढील तीन ते चार दिवस पाणी वापरता येणार नाही. प्रशासनाने संबंधित घटकांवर कारवाई करावी आणि येथून पुढे असा प्रकार घडू नये, याची खबरदारी घ्यावी.
- रूपाली कुसाळे, लोकनियुक्त सरपंच, वळिवडे
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.