Fish Famine : रायगडमध्ये पावसामुळे मत्‍स्‍यदुष्‍काळ

आठ-आठ दिवस समुद्रात राहून येणाऱ्या बोटींनासुद्धा अपेक्षित प्रमाणात मासे मिळत नसल्याने मच्छीमार हवालदिल झाले आहेत.
Fish Famine
Fish Famine Agrowon

अलिबाग : रायगड जिल्ह्यात अडीच महिन्यांपासून मासेमारीचा हंगाम (Fishing Season) सुरू झाला आहे; मात्र, बदलत्‍या हवामानामुळे खोल समुद्रात जाऊनही मुबलक मासे मिळत नाहीत. आठ-आठ दिवस समुद्रात राहून येणाऱ्या बोटींनासुद्धा अपेक्षित प्रमाणात मासे मिळत नसल्याने मच्छीमार (Fish Produces) हवालदिल झाले आहेत.

Fish Famine
Pm kIsan : ‘पीएम किसान’चा बारावा हप्ता दिवाळीपूर्वी

घोळ, बांगडा, पापलेट, सुरमईसाठी प्रसिद्ध असलेल्या बंदरात मच्छीमार रिकाम्या हाताने परतत आहेत. दररोज जिल्ह्यात कुठेतरी पाऊस पडत असतो, वाऱ्याचा वेगही जास्त असल्याने समुद्रही अनेकदा खवळलेला असतो. याचा फटका मासेमारीला बसतो आहे. जे मासे मिळतात ते स्थानिक बाजारातच संपून जातात, यामुळे बाहेरच्या बाजारपेठांमध्ये पाठवण्यास मासे शिल्लक राहत नसल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे.

दरवर्षी दिवाळीदरम्यान जादा पकडलेली मासळी मच्छीमार सुकवून ठेवतात. त्यामुळे मांदेली, बोंबील, सुकट असे सुक्या मासळीचे प्रकार बाजारात उपलब्ध होतात. यंदा मात्र मासळी सुकवण्याची संधीच मिळाली नाही.

मच्छीमारांच्या उत्‍पन्नात घट

एक जूनपासून पारंपरिक मासेमारी सुरू होऊनही आतापर्यंत एकाही मच्छीमाराच्या जाळ्यात पुरेशी मासळी येत नसल्याने स्थानिक मच्छीमार चिंतेत आहेत. रायगड जिल्ह्यातील करंजापासून बागमांडलापर्यंतचे मच्छीमार मत्‍स्‍य दुष्‍काळामुळे हैराण झाले त्‍यांच्या उत्‍पन्नावरही परिणाम होत आहे.

मासळीचे दर (प्रति किलो रुपयांत)

पापलेट ७००

सुरमय ७००

बांगडा ४००

कोळंबी ३०० +

मासे आहेत, परंतु सध्या पाऊस आणि वाऱ्याचा वेगही जास्‍त आहे. खोल समुद्रात मासे पकडण्यासाठी बोटींना डिझेल जास्त लागते; शिवाय एवढा खर्च करून मासे मिळतीलच, अशी शाश्वती नसल्याने मच्छीमार खोल समुद्रात जाणे टाळतात.

- मच्छिंद्र नाखवा, मच्छीमार, अलिबाग

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com