'चास कमान'च्या पाच दरवाजांतून विसर्ग

८.५३ टीएमसी पाणीक्षमता असलेल्या चास-कमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात (Catchment Area) पावसाचा जोर कायम असून धरणातील पाणीसाठा वेगाने वाढतो आहे.
chas kaman Dam
chas kaman DamAgrowon

चास : खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून शनिवारी (ता. १६) रोजी चास कमान धरणाचा (chas kaman Dam) पाणीसाठा ९१.०९ टक्यांवर (६. ९३ टीएमसी) वर पोहोचल्याने खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे पाचही दरवाजे उघडण्यात आले. धरणाचे एकूण पाच दरवाज्याद्वारे ४२९५ क्युसेकने पाणी भीमा नदी पात्रात सोडण्यात येत आहे.

पावसाचा जोर पाहता धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती धरण प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

८.५३ टीएमसी पाणीक्षमता असलेल्या चास-कमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात (Catchment Area) पावसाचा जोर कायम असून धरणातील पाणीसाठा वेगाने वाढतो आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात श्री क्षेत्र भीमाशंकर तसेच भोरगिरी, टोकावडे या भागात पावसाचा जोर कायम असल्याने येथील ओढ्या नाल्यांना पुराची स्थिती आहे व हेच पाणी पुढे चास-कमान धरणात येत असल्याने धरणातील पाणीसाठा वेगाने वाढण्यास मदत होते आहे.

शनिवार (ता. १६) रोजी सकाळी १० वाजता धरणातील पाणीसाठा नव्वद टक्यांच्या पुढे गेल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सकाळी १०.३० वाजता धरणाचे पाचही वक्र दरवाजे उघडण्यात आले. यातून सुमारे ४२९५ क्युसेक्स वेगाने पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. तर वीजनिर्मितीनंतर ७०० क्युसेक पाणी कालव्याव्दारे नदीपात्रात सोडण्यात येत आहे. धरणातून असे एकूण ४९९५ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

तीन मेगावॉट वीजनिर्मिती सुरू

धरणातून एका तासाला तीन मेगावॉट वीजनिर्मिती सुरू झाली आहे. मागील वर्षी धरण भरण्यासाठी ४ ऑगस्ट हा दिवस उजाडला होता व ४ ऑगस्टलाच धरणाचे दरवाजे पाचही दरवाजे उघडण्यात आले होते. मात्र चालू वर्षी धरणातील पाणीसाठा (Water Storage) शंभर टक्क्यांकडे झेपावला असून खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे पाचही वक्र दरवाजे उघडून भीमा नदीपात्रात विसर्ग सुरू झाला आहे. धरण परिसरात एक जूनपासून ५१७ मिलिमीटर. पावसाची नोंद करण्यात आली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com