नांदेड विभागातील पाच कारखाने अद्याप सुरू

आतापर्यंत विभागातील २२ कारखाने बंद झाले आहेत. २७ कारखान्यांनी (ता. ९) जूनअखेर एक कोटी ४७ लाख टन उसाचे गाळप केले. तर एक कोटी ५२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतल्याची माहिती साखर सहसंचालक कार्यालयातील सूत्रांनी दिली.
नांदेड विभागातील पाच कारखाने अद्याप सुरू
Sugar FactoryAgrowon

नांदेड : नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयांतर्गत नांदेड विभागातील गाळप हंगाम यंदा जून महिना सुरू होऊनही चालूच आहे. विभागातील लातूर जिल्ह्यात ऊस शिल्लक आहे. त्यामुळे लातूरमधील पाच कारखाने अद्याप सुरू आहेत. तर नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस संपला आहे. लातूरमधील पाच कारखाने बंद झाले आहेत.

आतापर्यंत विभागातील २२ कारखाने बंद झाले आहेत. २७ कारखान्यांनी (ता. ९) जूनअखेर एक कोटी ४७ लाख टन उसाचे गाळप केले. तर एक कोटी ५२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतल्याची माहिती साखर सहसंचालक कार्यालयातील सूत्रांनी दिली.

प्रादेशिक सहसंचालक (साखर) नांदेड विभागातील नांदेडसह परभणी, हिंगोली व लातूर या चार जिल्ह्यांतून गाळप हंगाम २०२१-२२ साठी २७ कारखान्यांनी ऑनलाइन अर्ज केले होते. यात १८ खासगी, तर नऊ सहकारी साखर कारखान्यांचा समावेश होता. आजपर्यंत २७ कारखान्यांनीच गाळप केले आहे. विभागाचा सरासरी साखर उतारा १०.४१ टक्के राहिला आहे. दरम्यान, नांदेड विभागाचे प्रादेशिक सहसंचालक सचिन रावल यांनी सर्व कारखाने सात जूनपर्यंत बंद होतील, असा अंदाज व्यक्त केला होता. परंतु ऊस शिल्लक राहिल्याने कारखान्यांना गाळप सुरू ठेवावे लागले आहे.

लातूर जिल्ह्यातील सुरू कारखाने

रेणा सहकारी साखर कारखाना सिंधगाव, रेणापूर, श्री साईबाबा शुगर शिवणी, ओसा, ट्वेंटीवन शुगर अॅण्ड अलाईड तळेगाव देवणी, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखाना, चिंचोलीराव वाडी व विलास सहकारी साखर कारखाना, वैशालीनगर, निवळी या कारखान्यांचा समावेश आहे.

कारखानानिहाय ऊसगाळप, साखर उत्पादन

जिल्हा...कारखाने...ऊसगाळप (टनांत)...साखर उत्पादन (क्विंटल)

नांदेड...सहा...२५,३०,७०७...२४,७९,०३५

लातूर...दहा...५९,६२,९६३...६३,२६,७५०

परभणी...सहा...४०,५३,९१५..४२,२०,२८८

हिंगोली...पाच...२१,४८,४०७...२२,६६,२७०

एकूण...२७...१,४६,९५,९९२...१,५२,९२,३०३

विभागाचा सरासरी साखर उतारा : १०.४१ टक्के

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com