परभणी जिल्ह्यात प्रादेशिक पाच नळपाणी पुरवठा योजना कार्यान्वित

जिल्ह्यातील ५ प्रादेशिक पाणीपुरवठा योजना जल जीवन मिशन कार्यक्रमात सहभागी असलेल्या ६१ ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि ग्रामसेवकांच्या अडीअडचणी समजावून घेण्यासाठी संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
परभणी जिल्ह्यात प्रादेशिक पाच
नळपाणी पुरवठा योजना कार्यान्वित
Water SupplyAgrowon

परभणीः जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने जिल्ह्यात ५ नळ प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. या योजनांमुळे अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटणार आहे. या योजना शाश्‍वत आणि चिरकाल टिकणाऱ्या व्हाव्यात यासाठी सरपंच - ग्रामसेवकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी केले.

शनिवारी (ता. ४) मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्ह्यातील ५ प्रादेशिक पाणीपुरवठा योजना जल जीवन मिशन कार्यक्रमात सहभागी असलेल्या ६१ ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि ग्रामसेवकांच्या अडीअडचणी समजावून घेण्यासाठी संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कार्यकारी अभियंता गंगाधर यंबडवार, ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील सर्व उपअभियंता, वरिष्ठ भू वैज्ञानिक कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

कार्यान्वित झालेल्या पाणीपुरवठा योजनांमध्ये वस्सा (ता. जिंतूर) अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा योजनेमधील १२ गावांचा समावेश आहे. कुपटा (ता. सेलू) अंतर्गत १६ गावांचा, पिंपळगाव काजळे (ता. जिंतूर) अंतर्गत २३ गावांचा, डासाळा (ता. सेलू )अंतर्गत ७ गावांचा गंगाखेड तालुकयातील तीन गावे, मानोली (ता. मानवत), झरी (ता. परभणी) या गावांचा समावेश आहे.

वालूर, कुपटा, कौसडीसारख्या मोठी लोकसंख्या असलेल्या गावांना प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना पोहोचविण्यासाठी वरिष्ठ भू वैज्ञानिक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी आवश्यक त्या उपाययोजना सुचविल्या. योजनेतील संबंधित गावांना गावातील जल स्रोत किंवा गावाजवळील नदी, धरण व इतर प्रकल्पांतून पाणी उपलध करून देण्यात येणार आहे. याकामी ग्रामीण पाणीपुरवठा विभाग आणि वरिष्ठ भू वैज्ञानिक विभाग यांची महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com