मुसळधार पावसामुळे गुजरातमध्ये पूरस्थिती

गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, सूरतसह अनेक भागांतील रस्ते जलमय झाले आहेत.
Gujrat Flood
Gujrat FloodAgrowon

नवी दिल्ली : गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे (Heavy Rain Gujrat) पूरस्थिती निर्माण झाली (Flooding In Gujrat) असून, सूरतसह अनेक भागांतील रस्ते जलमय झाले आहेत. भारतीय हवामान खात्याच्या (weather Department) ताजा अपडेटनुसार, पुढील चार दिवस देशातील दहा राज्यांमध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rain Forecast) पडण्याची शक्यता आहे. त्यात मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्‍चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांचा समावेश आहे. तर, काही राज्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळं आयएमडीनं लोकांना दक्ष राहण्याचा इशारा दिला आहे.

Gujrat Flood
Turmeric : शेतकरी पीक नियोजन : हळद

सूरतमध्ये पावसामुळे रस्ते जलमय

गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. सूरतमध्ये मिठी खाडी भागात पूरस्थितीमुळे रस्ते जलमय झाले आहेत. सौराष्ट्र आणि कच्छसह अनेक जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात अनेक ठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे.

मध्य प्रदेशातही परिस्थिती बिकट

मध्य प्रदेशातही मुसळधार पावसामुळे परिस्थिती बिकट होत आहे. गुना, राजगढ, आगर मालवा, रतलाम, नीमच आणि मंदसौर जिल्ह्यात पुराचा इशारा देण्यात आलाय. आतापर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे किनारपट्टी भागात राहणारे जनजीवनही विस्कळीत झालंय.

Gujrat Flood
Rain : पुणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी

ओडिशामध्ये यलो अलर्ट जारी

ओडिशाला यलो अलर्ट देण्यात आला आहे. सिक्कीम, आसाम, मेघालय, नागालँड, पुद्दुचेरीतही पावसाची शक्यता वर्तवली आहे. राजधानी दिल्लीमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान ३६ अंश आणि किमान तापमान २५ अंश असू शकते असे हवामान खात्याने म्हटले आहे.

राजस्थानमध्येही पावसाची शक्यता

पंजाब, हरियाना, छत्तीसगडमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे, तर राजस्थानमध्येही पावसाची शक्यता आहे. जर आपण दक्षिण भारताबद्दल बोलायचं झालं तर तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळमध्येही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

जोरदार पाऊस अपेक्षित

खासगी हवामान एजन्सी स्कायमेटने म्हटले आहे, की पुढील २४ तासांत महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, गोवा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, तेलंगणा, ओडिशा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. हरियाना, उत्तर प्रदेशात मुसळधार आणि दिल्लीत हलक्या पावसाची शक्यता आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com