Flood: पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती

लांजा येथे जोरदार पावसाची नोंद झाली. तर मंडणगड आणि संगमेश्वर देवरुख येथेही मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडला. याशिवाय दापोली, चिपळून, वाकवाळी येथे जोरदार पाऊस झाला.
Maharashtra Flood
Maharashtra FloodAgrowon

पुणेः राज्यात पावसाचा जोर कायम आहे. बुधवारी राज्यातील अनेक भागांत पूरस्थिती (Flood Situation) कायम होती. पूर्व विदर्भ आणि कोकणात मुसळधार पाऊस सुरुच होता. तर हवामान विभागानं उद्या सकाळपर्यंत रत्नागिरी, रायगड, पालघर तर मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे, नाशिक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय. तर विदर्भातील अमरावती, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातही जोरदार पावसाची शक्यता वर्तविली.

कोकणात बुधवारी पावसाचा जोर कमी झाला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पाऊस कमी झाला. मात्र अधूनमधून सरी पडत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडीत ८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर सावंतवाडी, कुडाळ आणि दोडामार्ग या भागांतही जोरदार पाऊस झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागांना पावसानं अक्षरशः झोडपून काढलं.

लांजा येथे जोरदार पावसाची नोंद झाली. तर मंडणगड आणि संगमेश्वर देवरुख येथेही मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडला. याशिवाय दापोली, चिपळून, वाकवाळी येथे जोरदार पाऊस झाला. रायगड जिल्ह्यातही पावसाचा जोर अधिक होता. ताळा येथे पावसाचं प्रमाण जास्त होतं. तर खालापूर, महाड, मानगाव, म्हसला, पेन, पोलादपूर, रोहा, श्रीवर्धन, सुधागड या मंडळांमध्येही पावसाचा जोर अधिक होतो.

कोल्हापूर जिल्ह्याच्या बहुतांश भागांत पावसाचा जोर कमी झाला. मात्र धरण क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे राधानगरी धरण काठोकाठ भरले. त्यामुळं राधानगरी धरणातून ३२०८ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पुणे जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पाऊस सक्रिय झाला आहे.

Maharashtra Flood
Kharif Sowing: सरासरी पाऊस खरिपासाठी लाभदायक

जिल्ह्याच्या पश्चिम पट्यात पावसाचा जोर अधिक आहे. लोणावळा येथे २१८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूये. त्यामुळं धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होतेय. नगर जिल्ह्यातही ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झाला. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे ९० मिमी. पाऊस झाला. तर सुरगाणा, त्र्यंबकेश्वर या भागांना पावसानं झोडपलं.

पूर्व विदर्भात पावसाचा जोर अधिक होता. पावसामुळं अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथे २२० मिलिमीटर पावसाचाी नोंद झाली. तर सडकअर्जुनी येथे १९० मिमी. तर गोरेगाव १८० मिमी. देवरी १३० मिमी आणि सालेकसा येथे १०० मिमी. पावसाची नोंद झाली.

तर भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे १९० मिमी, तर मोहाडी येथे १६० मिमी. पाऊस पडला. गडचिरोली जिल्ह्यतील कोर्ची येथे १७० मिमी पाऊस झाला. गडचिरोली जिल्ह्यातील जवळपास सर्वंच मंडळांध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला. नागपूर जिल्ह्यातही अनेक भागांत पावसाचा जोर अधिक होता. तर चंद्रपूर जिल्ह्यातही काही मंडळांमध्ये १०० मिमी.पेक्षा अधिक पाऊस झाला.

अकोला, वाशीम आणि बुलडाणा जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झालाय. मात्र अनेक ठिकाणी हलक्या करी पडत आहेत. सततच्या पावसानं पिकांचं नुकसान वाढतय. बुधवारी अनेक भागांत पावसानं ठाण मांडलं होतं. दिवसभर रिमझिम पाऊस पडला.

खानदेशात अनेक ठिकाणी हलक्या सरी पडल्या. धुळे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस झाला. तर जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे ७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मराठवाड्यातही ठिकठिकाणी पावासनं हजेरी लावली. औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड, सोयगाव, कन्नड, फुलंब्री या तालुक्यांतील अनेक भागांत हलका पाऊस झाला. तर जालना जिल्ह्यातील भोकरदन, जाफ्राबाद, अंबड, परतूर तालुक्यात हलक्या ते मध्यम सरी बरसल्या. नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातही अनेक भागांत हलका पाऊस झाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com