आसाममध्ये २५ लाख लोकांना पुराचा तडाखा

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या ताज्या माहितीनुसार, ७९ महसूल मंडळे आणि २८९४ गावांचा समावेश असलेल्या राज्यातील २७ पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये २५ लाखांहून अधिक लोक अजूनही अडचणींचा सामना करत आहेत.
Assam Flood
Assam FloodAgrowon

गुवाहाटी (पीटीआयः आसाममधील पूरस्थिती (Assam Flood) रविवारीही (ता.२६) गंभीर आहे. काही भागांतून पाण्याची पातळी कमी होऊ लागली असली तरी २५ लाखांहून अधिक लोक अजूनही पुराच्या कचाट्यात अडकलेले आहेत.

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Srama) यांनी दिवसभरात, कछार जिल्ह्यातील सिलचरला भेट दिली. हा भाग सर्वात जास्त प्रभावित क्षेत्रांपैकी एक आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या ताज्या माहितीनुसार, ७९ महसूल मंडळे आणि २८९४ गावांचा समावेश असलेल्या राज्यातील २७ पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये २५ लाखांहून अधिक लोक अजूनही अडचणींचा सामना करत आहेत.

गेल्या दोन आठवड्यांपासून पूर आणि भूस्खलनाशी झुंज देत असलेल्या ईशान्येकडील राज्यातील ६३७ मदत छावण्यांमध्ये सुमारे २.३३ लाख लोकांनी आश्रय घेतला आहे. तर २५९ मदत केंद्रांत, आश्रय शिबिरांत न ठेवलेल्या बाधित लोकांना मदत पुरविली जात आहे.

एनडीआरएफ (NDRF), एसडीआरएफ (SDRF), अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा, पोलिस आणि एएसडीएमए दल बाधित भागातील लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाला मदत करत आहेत. आतापर्यंत ६७२३७ लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे, अशी माहिती मिळाली आहे.

मृतांची संख्या १२१ वर

आसामच्या विविध भागांमध्ये आलेल्या पुरात शनिवारी आणखी चार जणांचा मृत्यू झाला. पूर आणि भूस्खलनामुळे या वर्षी राज्यातील मृतांची संख्या १२१ झाली आहे. कामरूप जिल्ह्यात भूस्खलन झाल्याची माहिती आहे, असे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे सांगण्यात आले.

नद्या धोक्याच्या पातळीवर

राज्यात एका दिवसांत सरासरी ७ मिमी पाऊस झाला. १ मार्चपासून राज्यात १ हजार ८९१.९५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. केंद्रीय जल आयोगाच्या माहितीनुसार, नागावमधील धरमतुल येथील कोपिली नदी, करीमगंजमधील बीपी घाटावरील बराक आणि कछारमधील एपी घाट आणि तिची उपनदी कुशियारा धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com