Flood : गडचिरोली वगळता विदर्भात पूर ओसरला

विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मंगळवारी (ता. १९) पावसाचा जोर कमी झाला. परिणामी सर्वच जिल्ह्यांमधील पूरस्थिती काहीशी नियंत्रणात आली होती.
Gadchiroli Flood
Gadchiroli FloodAgrowon

नागपूर : विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मंगळवारी (ता. १९) पावसाचा जोर (Rain Force Recede) कमी झाला. परिणामी सर्वच जिल्ह्यांमधील पूरस्थिती (Flood Condition In Control) काहीशी नियंत्रणात आली होती. गोसेखुर्द प्रकल्पातून (Gosekhurd Project) होणारा पाण्याचा विसर्ग तसेच छत्तीसगडमध्ये होणाऱ्या पावसाच्या परिणामी वाढ झाल्याने जिल्ह्यातून जाणारे तब्बल वीस मार्ग आजही बंद होते.

सोमवारी (ता.१८) वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर होता. परिणामी सर्वच नद्यांच्या पाण्याची पातळी वाढल्याने, काही ठिकाणी पूल खचले गेले. तर, काही भागात पुलावरून पाणी वाहत असल्याने रस्ते वाहतूक बंद झाली होती. मंगळवारी (ता. १९) पहाटेपासून पावसाचा जोर कमी झाल्याने ही वाहतूक पूर्ववत झाली. सध्या केवळ गडचिरोली जिल्ह्यातील नद्यांची पातळी वाढली असल्यामुळे वीस मार्गांवरील वाहतूक बंद आहे.

Gadchiroli Flood
पूर, भूस्खलनामुळे आसाममध्ये १ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

गडचिरोलीत मंगळवारी ८६ कुटुंबातील २९६ नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. गोसेखुर्द धरणाच्या ३३ पैकी ३२ दरवाजांमधून २.११ लक्ष क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे वैनगंगा नदीच्या उपनद्यांना पूर आल्यामुळे काही भागात प्रशासनाकडून मदतकार्य राबविले जात आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये परिस्थिती पूर्व पदावर येत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. काही भागात सोमवारी दुपारपासून, तर काही भागात रात्रीनंतर पावसाने उघडीप दिली आहे. संततधार पावसाचा लाखो हेक्टरवरील शेतीला फटका बसल्याचे सूत्रांनी सांगितले.

Gadchiroli Flood
Godavari Flood : ‘गोदावरी’ला आला पूर

अमरावती विभागातील प्रकल्पांची स्थिती

अमरावती जिल्ह्यातील उर्ध्ववर्धा (३४०.९६), यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्प (३९२.८०), अरुणावती (३२७.१४), बेंबळा (२६६.४५), अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा (३४४.१८), वान (४०५.२०), बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा (२९०.००), पेनटाकळी (५५६.५५), खडकपूर्णा (५१७.८१).

मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी (मिमीमध्ये)

अमरावती जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी शहानूर (४४३.२५), चंद्रभागा (५०२.२०), पूर्णा (४४८.५९), सपन (५०७.५०), पंढरी (४२५.४८), गर्गा (२४५.८०), बोर्डीनाला (३६३.२०),यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस (३०४.२८), सायखेडा (२७२.५०), गोकी (३१५.७०), वाघाडी (३१८.६०), बोरगांव (३१९.००), नवरगाव (२५४.१०), अकोला जिल्ह्यातील निर्गुणा (३८८.२०), मोर्णा (३६४.००), उमा (३४२.१५), घुंगशीबॅरेज (२६२.३०), वाशिम जिल्ह्यातील अडाण (३७९.५३), सोनल (४५०.८२), एकबुर्जी (१४८.३५), बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा (४०१.६०), पलढग (४००.५५), मस (३२३.७०), कोराडी (५४५.२५), मन (३७२.२०), तोरणा (४०३.१०), उतावळी (३६९.५०) आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com