Weather Update : ढगाळ हवामानासह तापमानात चढ-उतार कायम राहणार

बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात एकापाठोपाठ तयार होणाऱ्या प्रणालींच्या प्रभावामुळे राज्यात ढगाळ हवामान आहे. पावसाने हजेरी लावली आहे. ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ होण्याबरोबरच उकाड्यातही वाढ झाली आहे.
Weather Update
Weather UpdateAgrowon

पुणे : बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात (Arabian Sea) एकापाठोपाठ तयार होणाऱ्या प्रणालींच्या प्रभावामुळे राज्यात ढगाळ हवामान (Cloudy Weather) आहे. पावसाने हजेरी लावली आहे. ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात (Temperature) वाढ होण्याबरोबरच उकाड्यातही वाढ झाली आहे. आज (ता. १६) राज्यात ढगाळ हवामानासह तापमानातील चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला.

Weather Update
Weather Update : राज्यातील किमान तापमानात चढ-उताराची शक्यता

उत्तरेकडील राज्यांमध्येही गारठा चांगलाच वाढला आहे. राजस्थानमधील चुरू येथे गुरुवारी (ता. १५) देशाच्या सपाट भू-भागावरील यंदाच्या हंगामातील सर्वांत नीचांकी २.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरू असले तरी, किमान तापमानातील वाढ कायम आहे. महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १६ अंश सेल्सिअस होते. उर्वरित राज्यात किमान तापमान १६ ते २५ अंशांच्या दरम्यान होते.

उत्तर महाराष्ट्र, औरंगाबादमध्ये पाऊस

बुधवारी (ता. १४) उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा, सिन्नर, नाशिक शहरासह विविध भागात मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. औरंगाबाद शहरासह चित्ते पिंपळगाव, निपाणी, आडगाव, भालगाव, पाचोड, एकोड परिसरात बुधवारी मध्यरात्री जोरदार पाऊस पडला.

Weather Update
Weather Update : पावसानं वाढवली चिंता !

नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुका आणि परिसरात पावसाने हजेरी लावली. मराठवाड्यातील औरंगाबाद येथे ४० मि.मी, गंगापूर येथे ३० मि.मी, उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार जिल्ह्यातील धाडगाव येथे ३० मि.मी, नवापूर १० मि.मी, नाशिक जिल्ह्यातील येथे नाशिक शहरात २० मि.मी, तर पेठ येथे १० मि.मी पावसाची नोंद झाली.

वादळी प्रणाली किनाऱ्यापासून सरकतेय दूर

पूर्व-मध्य बंगालच्या अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढून वादळी प्रणालीची (डीप डिप्रेशन) निर्मिती झाली आहे. लक्षद्वीपच्या अमनदीवीपासून ६२० किलोमीटर, पणजीपासून ६७० किलोमीटर पश्चिमेकडे असलेली वादळी प्रणाली भारताच्या किनाऱ्यापासून दूर पश्चिमेकडे सरकत आहे. या प्रणालीची तीव्रता हळूहळू ओसरण्याचे संकेत आहेत. तर आग्नेय बंगालच्या उपसागरात विषूववृत्ताजवळ कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. या प्रणालीची तीव्रता वाढण्याचे संकेत आहेत.

गुरुवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३०.८ (१७.३), जळगाव ३०.८ (२१.४), धुळे ३२.० (१७.६), कोल्हापूर २८.५ (१९.५), महाबळेश्वर २२.८(१६.०), नाशिक ३०.५ (१९.५), निफाड ३०.० (१८.५), सांगली २९.२ (१९.१), सातारा ३०.७(१७.४), सोलापूर ३२.८ (२०.५), सांताक्रूझ ३४.९(२४.४), डहाणू ३२.८ (२४.२), रत्नागिरी ३३.७ (२२.५), औरंगाबाद २९.७ (१७.८), नांदेड - (२२.०), परभणी ३१.१ (२०.६), अकोला ३२.४ (२१.७), अमरावती ३१.६ (१९.७), बुलडाणा ३१.० (१९.५), ब्रह्मपुरी ३३.८ (१८.०), चंद्रपूर ३०.८ (२०.०), गडचिरोली ३१.६(१६.६), गोंदिया ३०.६(१९.५), नागपूर ३१.९ (१९.७), वर्धा ३१.२(१९.४), यवतमाळ ३१.० (२०.०).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com