ओबीसी आरक्षणासाठी पाठपुरावा

खासदार सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद; यशवंतराव चव्हाण सेंटरचे उद्‍घाटन
ओबीसी आरक्षणासाठी पाठपुरावा

वर्धा ः राज्यात निवडणुका होऊ घातल्या आहेत. यात ओबीसींचे आरक्षण (OBC Reservation) बाद करण्यात आले आहे. असा प्रकार पुन्हा होणार नाही याकरिता समिती त्याचा अभ्यास करीत आहे. इतर राज्यांप्रमाणे घाई केल्यास त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे त्याचा पाठपुरावा (Follow up for OBC reservation) सुरू असल्याची माहिती सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी बुधवारी (ता. १५) पत्रकार परिषदेत दिली.

केंद्र शासनाकडून पेट्रोल, डिझेल, घरगुती सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत. याचा फटका सर्वसामान्यांना बसत असल्याने राज्य शासनाने कर कमी करून दिलासा दिला. हा दिलासा प्रत्येक व्यक्तीला मिळण्याकरिता केंद्र शासनाने त्यांच्याकडून आकारण्यात येणारे इतर कर कमी करून आणखी दर कमी करणे शक्य असल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

वर्ध्यात यशवंतराव चव्हाण सेंटरच्या उद्घाटनासाठी त्या आल्या होत्या. या वेळी त्या बोलत होत्या. या केंद्रातून महिला सबलीकरण, युवा पिढीसमोर असलेली आव्हाणे आदी विषयांवर कार्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या वेळी माजी केंद्रीयमंत्री सुबोध मोहिते, माजी आमदार सुरेश देशमुख, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, ॲड. सुधीर कोठारी, अभिजित फाळके, दिवाकर गमे, राजू तिमांडे, किशोर माथनकर, अतुल वांदिले, राजाभाऊ टाकसाळे, क्रांती धोटे यांच्यासह जिल्ह्याचे नेते पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्ह्यातील ताकद वाढणार

जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विस्तारासाठी पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी दौरा करून आढावा घेतला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्ह्यातील ताकद वाढणार आहे. हे येत्या दिवसांत सर्वांच्या लक्षात येईल यात दुमत नसल्याचे त्या म्हणाल्या.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com