करवीर तालुक्यात पूरग्रस्तांसाठी दीड कोटींचा निधी मंजूर

बाधित कुटुंबांचे पुनर्वसन करण्यासाठी ज्यांना नवीन गावठाणात भूखंड वाटप केले होते. मात्र त्यांची विक्री केली आहे, अशा ४८ कुटुंबांना गावठाणात पुनर्वसनासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासकीय भूखंड विक्री तत्त्वावर उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
करवीर तालुक्यात पूरग्रस्तांसाठी दीड कोटींचा निधी मंजूर
Kolhapur FloodAgrowon

कोल्हापूरः करवीर तालुक्यातील चिखली, शिंगणापूर, वळिवडे गावांतील बाधित कुटुंबांना घर बांधण्यासाठी व पडझड बाधितांना एक कोटी ५६ लाख ४२ हजार ३०० रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला असून दोन वर्षे पाठपुरावा केल्याची माहिती आमदार पी. एन. पाटील यांनी दिली.

आमदार पाटील म्हणाले, की चिखली, शिंगणापूर, वळिवडेत १९८९ मध्ये आलेल्या महापुराने बाधित कुटुंबांचे नवीन गावठाणात पुनर्वसन केले होते. मात्र तेथील लोक मूळ गावठाणातच वास्तव्याला आहेत. २०१९ मधील पूरबाधित नागरिकांना तांत्रिक अडचणीमुळे मदत मिळू शकली नव्हती. त्यासाठी पुनर्वसन मंत्री नामदार विजय वडेट्टीवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर शासनाने नवीन आदेश काढला. काल मंत्री वडेट्टीवार यांनी बाधितांना मदत देण्याचे पत्र मंजूर केले आहे.

बाधित कुटुंबांचे पुनर्वसन करण्यासाठी ज्यांना नवीन गावठाणात भूखंड वाटप केले होते. मात्र त्यांची विक्री केली आहे, अशा ४८ कुटुंबांना गावठाणात पुनर्वसनासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासकीय भूखंड विक्री तत्त्वावर उपलब्ध करून दिले जाणार आहेत. अंशतः घर पडझड झालेल्या बाधित कुटुंबांपैकी ज्यांनी पुनर्वसन गावठाणात बांधकाम केले नाही, अशा १८२ कुटुंबांना भूखंडावर घराचे बांधकाम करण्याच्या अटीवर सहा हजार रुपये प्रतिकुटुंब अशी मदत दिली जाणार आहे. हा निधी पुणे विभागीय आयुक्तांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना वितरित करण्यास मंजुरी दिल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले.

असे दिले जाणार अनुदान...

पुनर्वसन गावठाणात वाटप केलेल्या भूखंडावर घराचे बांधकाम करण्यासाठी प्रतिकुटुंब ९५ हजार १०० रुपये अनुदान देण्यात येणार आहे. अंशतः पडझड झालेल्या घरांसाठी प्रतिकुटुंब सहा हजार अनुदान दिले जाणार आहे. ज्या भूखंडधारकांनी नवीन भूखंडावर घर बांधलेले नाही अशा १५३ कुटुंबांना घर बांधण्याच्या अटीवर प्रतिकुटुंब ९५ हजार १०० रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com