Farming Workshop : नैसर्गिक शेती कार्यशाळेसाठी येणार दोन हजार शेतकरी

पुण्यात गुरुवारी राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन
Farming Workshop
Farming WorkshopAgrowon

पुणे : नैसर्गिक शेतीमधील (Natural Farming) संधी आणि विकास या विषयावर येत्या गुरुवारी (ता. ६) पुण्यात राज्यस्तरीय कार्यशाळा होत आहे. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत,(Acharya Devrat) तसेच राज्यातील विविध मंत्री यांच्या उपस्थितीत होत असलेल्या या कार्यशाळेसाठी दोन हजार शेतकरी प्रतिनिधी हजेरी लावणार आहेत.

Farming Workshop
Sugar Mill : सुधाकरपंत परिचारकांचे पांडुरंग कारखान्याला नाव

देशात नैसर्गिक शेतीला देशात प्रोत्साहन देणे व रासायनिक खतांचा मुख्यत: युरियाचा वापर कमी करणे यावर भर देण्याचे निर्देश पंतप्रधानांनी दिलेले आहेत. राज्यपाल देवव्रत यांनी हरियाना येथे नैसर्गिक शेतीचे प्रयोग केले आहेत.

Farming Workshop
Kharip Crop : परभणातील १०८ गावांत हंगामी पैसेवारी ५० पेक्षा कमी

तसेच त्याचा प्रसार गुजरातमध्ये सुरू केला आहे. त्यांनी कुरुक्षेत्र येथील गुरुकुलाची २०० एकर शेती नैसर्गिक शेती पद्धतीखाली आणली आहे. त्यामुळे शाश्‍वत शेतीसाठी या पर्यायांची चर्चा कार्यशाळेत होईल.

Farming Workshop
Crop Damage : नुकसानग्रस्तांना पीकविम्याचा लाभ द्या,

बालेवाडीच्या क्रीडा संकुलमध्ये होत असलेल्या या कार्यशाळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र ‍शिक्षण, वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे उपस्थित राहणार आहेत.

तांत्रिक सत्रात तज्ज्ञ मार्गदर्शन तसेच राज्यात नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे अनुभव कथन होणार आहे.नैसर्गिक शेतीसंबंधी एक प्रदर्शनदेखील या वेळी आयोजित करण्यात आले आहे.

राज्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालये, शासकीय कार्यालये, कृषी विज्ञान केंद्रे व कृषी संशोधन संस्थांमध्ये कार्यशाळेचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. तसेच शेतकऱ्यांना https://www.youtube.com/c/AgricultureDepartmentGoM या लिंकवर प्रक्षेपण बघता येणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com