कपाशीच्या बियाणे खरेदीसाठी शेतकरी आदिलाबादला

बी.टी. बियाण्याच्या आदिलाबाद येथील दरात व पुसद येथील दरात साम्य आहे. शेतकरी वर्ग पुसदमधून कपाशीचे बियाणे खरेदी करण्याचे टाळत आहे.
कपाशीच्या बियाणे खरेदीसाठी शेतकरी आदिलाबादला
CottonAgrowon

आरेगाव, जि. यवतमाळ : पुसद तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात सुमारे २४,४८० हेक्टरवर कपाशी लागवड होण्याची शक्यता आहे. कोरडवाहू क्षेत्रावरील शेतकरी कपाशीची लागवड करतात. यंदा या शेतकऱ्यांनी कपाशीचे बी.टी. बियाणे खरेदीसाठी आदिलाबादकडे धाव घेतली आहे.

मागील तीन-चार वर्षांपासून कपाशीच्या बोगस बियाण्यामुळे शेतकऱ्‍यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. यामूळे यंदा बहुतांश शेतकऱ्यांनी आदिलाबाद येथून कपाशीचे बियाणे खरेदी केले आहे. पुसदमधील कृषी केंद्रचालकांशी या संदर्भात चर्चा केली. दरवर्षीच्या तुलनेत कपाशीच्या बियाण्याच्या मागणीत घट झाली असल्याचे अनेक कृषी केंद्रचालकांनी सांगितले.

बी.टी. बियाण्याच्या आदिलाबाद येथील दरात व पुसद येथील दरात साम्य आहे. शेतकरी वर्ग पुसदमधून कपाशीचे बियाणे खरेदी करण्याचे टाळत आहे. बियाण्याचाही तुटवडा असल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षी तीन हजार रुपयाला मिळणारी तीस किलोची बँग यंदा चार हजारावर पोहोचली आहे.

‘९६०५’ या वाणाचा दर ४,५५० रुपये प्रति बॅग झाला आहे. त्याही कृषी केंद्रांवर अल्प प्रमाणात उपल्बध आहेत. तर महामंडळाकडून ‘महाबीज’च्या बियाण्याचा पुरवढा ही यंदा कमी आहे. एकंदरीतच यंदाचा खरीप हंगाम कृषी निविष्ठांच्या वाढलेल्या किमतीमुळे आतापासूनच शेतकऱ्‍यांचा जीव मेटाकुटीस आणत आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com