शाश्‍वत विकासासाठी नैसर्गिक शेती काळाची गरज

संचालक विस्तार शिक्षण डॉ. देवराव देवसरकर यांचे प्रतिपादन
Natural Farming
Natural FarmingAgrowon

गेवराई : कृषी विज्ञान केंद्र, खामगाव, कृषी विभाग व ‘आत्मा’ बीड यांच्या संयुक्त विद्यमाने आणि महिला आर्थिक विकास महामंडळ व धान फाउंडेशन बीड यांच्या सहकार्याने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ‘किसान भागीदारी प्राथमिकता हमारी’ या अभियानांतर्गत मंगळवारी (ता. २६) कृषी विद्यान केंद्र, खामगाव येथे भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

त्या प्रसंगी, शेतीच्या शाश्‍वत विकासासाठी (Sustainable Development) नैसर्गिक शेती (Natural Farming) काळाची गरज असल्याचे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (Vasatrao Naik Marathwada University) परभणीचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. देवराव देवसरकर (Dr. Devrao devskar) यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष संचालक विस्तार शिक्षण वनामकृवि परभणीचे डॉ. देवराव देवसरकर होते. बीडचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर, प्रकल्प संचालक, ‘आत्मा’ बीडचे दत्तात्रय मुळे, खामगावचे सरपंच बालाजी गिते व गेवराई तालुका कृषी अधिकारी अभय वडकुते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्याचप्रमाणे तांत्रिक सत्रातील प्रमुख मार्गदर्शन अंबाजोगाईचे विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. वसंत सूर्यवंशी व बीडचे सेंद्रिय शेती कृषिभूषण शिवराम घोडके यांनी केले.

या प्रसंगी आयोजित कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कृषी प्रदर्शनामध्ये कृषी यांत्रिकीकरणासाठी विविध अवजारे, जैविक नियंत्रण युनिटमध्ये दशपर्णी व जिवामृत, महिला बचत गटांच्या स्टॉलचा समावेश होता.

यानंतर या कार्यक्रमामध्ये प्रगतिशील शेतकरी व महिला शेतकरी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डॉ. हनुमान गरुड विषय विशेषज्ञ कृषी विद्या यांनी नैसर्गिक शेतीअंतर्गत द्रवरूप जिवाणू खतांचे महत्त्व व वापरण्याच्या पद्धती या विषयीच्या घडी पत्रिकेचे विमोचन करण्यात आले. यानंतर ‘आत्मा’ प्रकल्प संचालक दत्तात्रय मुळे यांनी कृषी विभागातील विविध योजना या विषयी मार्गदर्शन केले.

यानंतर कृषिभूषण शिवराम घोडके यांनी सेंद्रिय शेती काळाची गरज, याबद्दल शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर डॉ. वसंत सूर्यवंशी विस्तार कृषी विद्यावेत्ता यांनी जैवसंपृक्त पिके आणि तेलबिया तसेच खरीप हंगाम पूर्वतयारी या विषयावर उत्कृष्ट सादरीकरण करून मार्गदर्शन केले.

शेवटी अध्यक्षीय समारोपामध्ये डॉ. देवराव देवसरकर यांनी शेतीला लघु उद्योगाची जोड असणे, सोयाबीनपासून प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करणे, विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणे सुधारित वाणांचा वापर करणे, बीज प्रक्रियेचा अवलंब करणे, एक ते एक पीक घेण्याऐवजी आलटून-पालटून पिके घेणे आणि रुंद वरंबा सरी पद्धतीचा अवलंब करणे, असा सल्ला दिला. या कार्यक्रमाला दोनशेहून अधिक शेतकरी व महिला शेतकरी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com