Rain Update : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा कहर

जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता. १९) पावसाचा कहर सुरूच असून सर्वत्र खरीप पिकांसह फलोत्पादन क्षेत्राचे नुकसान झाल्याची गंभीर परिस्थिती आहे.
Rain Update
Rain UpdateAgrowon

नाशिक : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता. १९) पावसाचा कहर (Heavy Rainfall) सुरूच असून सर्वत्र खरीप पिकांसह (Kharip Crop) फलोत्पादन क्षेत्राचे नुकसान (Horticulture Sector) झाल्याची गंभीर परिस्थिती आहे. गेल्या दोन दिवसांत अनेक भागांत अतिवृष्टी(Weight Drought) झाल्याने पिके पाण्याखाली गेल्याने मातीमोल झाली. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावरच सणासुदीच्या उत्साहाची लहर ओसरली आहे.

Rain Update
Heavy Rainfall : मुसळधारेचा रत्नागिरीला फटका

सोमवारपासून (ता. १७) पावसाचा जोर कायम आहे. मंगळवारी (ता. १८) जिल्ह्याला पावसाने पुन्हा तडाखा दिला. मालेगाव तालुक्यातील सौंदाने, दाभाडी व निमगाव परिसरात पुन्हा मुसळधार पाऊस झाला. सटाणा तालुक्यात मुल्हेर, ताहाराबाद, डांगसौंदाने परिसरात पावसाचा जोर होता. सुरगाणा तालुक्यात सर्वदूर हजेरी लावली. कळवण तालुक्यात कळवण, कानाशी, दळवट, अभोणा परिसरात जोरदार वृष्टी झाली.

या भागात मका, सोयाबीन व भाजीपाला पिके, कांदा रोपांचे नुकसान वाढले.नाशिक तालुक्यातील माडसांगवी, ओढा, मखमलाबाद परिसरात अतिवृष्टीसदृश पावसाने दाणादाण उडवली. पावसाचा जोर दुपारनंतर वाढल्याने द्राक्ष बागांमधून पाणी वाहत होते. दिंडोरीत मोहाडी, उमराळे, वरखेडा परिसरात जोराचा पाऊस झाला.

निफाडमधील चांदोरी, सायखेडा, देवगाव परिसरात पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडविली. सोयाबीन, मका पिकांचे नुकसान वाढलेले आहे. सुरगाणा, नाशिक, इगतपुरी, पेठ, त्र्यंबकेश्र्वर तालुक्यांत भात पिकाला मोठा फटका बसला. पावसामुळे पीक आडवे झाले. काही ठिकाणी भात पीक धान्य भरण्याच्या अवस्थेत आहे; मात्र पावसात आडवे पडल्याने नुकसान वाढले आहे.

पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे छाटणी अडचणीत सापडली आहे. ज्या भागात छाटण्या पूर्ण होऊन फुटीच्या अवस्थेत आहेत, त्या बागांचे नुकसान वाढते. कोवळी पाने पावसाच्या फटक्यात फाटली आहेत. त्यामुळे आगामी घड निघण्याचे प्रमाण कमी होण्याचा धोका असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. सततच्या पावसामुळे सोंगणी झालेली सोयाबीनचा गाळ झाल्याची परिस्थिती आहे.

धराणातून विसर्ग वाढविला

जिल्ह्यात पश्चिम भागांतील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे सहा धरणांमधून पुन्हा विसर्ग सोडण्यात येत आहे.

धरण विसर्ग (क्युसेक)

दारणा ८५०

कडवा २१२

वालदेवी ६५

आळंदी ३०

भोजापूर १५२४

पालखेड १७४८

नांदूरमधमेश्वर ८९३८

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com