Weather Update : पावसाची उघडीप कायम राहणार?

राज्याच्या काही भागांत सोमावारी पावसाने हजेरी लावली होती. मात्र पावसाचं प्रमाण कमी होतं. कोणकणात तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडल्या.
Weather Update
Weather UpdateAgrowon

पुणेः राज्यात बहुतांशी भागात सोमवारी पावसाची (Rain) उघडीप होती. तर तूरळक ठिकाणी हलक्या सरी झाल्या. राज्यात ऊन वाढल्याने किमान तापमानात वाढ (Heat Increased) झाली होती. तर पुढील चार ते पाच दिवस बहुतांश भागांत पाऊस उघडीप देण्याची शक्यता आहे. तर उद्या सकाळपर्यंत पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट (Heavy Rain Yellow Alert) जारी करण्यात आला.

Weather Update
Fertilizer : विक्रेत्यांना मिळणार दुकान पोहोच खत

राज्याच्या काही भागांत सोमावारी पावसाने हजेरी लावली होती. मात्र पावसाचं प्रमाण कमी होतं. कोणकणात तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही मंडळांत पावसाच्या सरी पडल्या. मात्र जिल्ह्यात ऊन वाढून उकाड्यात वाढ झाली होती. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी हलका पाऊस झाला. काही भागांत ढगाळ हवामान होत आहे. मात्र पाऊस झाला नाही. कोकणातील उकाड्यात वाढ झाल्याची स्थिती सोमवारी होती.

Weather Update
Tur Sowing : खानदेशात तूर लागवड स्थिर

मध्य महाराष्ट्रातही सोमवारी पावसाची दडी कायम होती. काही ठिकाणी पाऊस झाला. मात्र पावसाचा जोर नव्हता. कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. बहुतांश भागांत सकाळपासून ऊन पडले होते. धरणक्षेत्रात अधूनमधून हलक्या पावसाच्या सरी पडत होत्या. खानदेशातही पावासने उघडीप दिली. काही ठिकाणी ढगाळ वातावरण होते.

मराठवाड्यात काही ठिकाणी हलका पाऊस झाला. जालना, नांदेड आणि परभणी जिल्ह्यात तूरळक ठिकाणी काही वेळ हलक्या सरी झाल्या. तर इतर भागांत ऊन पडलेले होते. विदर्भात पूर्व भागात अनेक ठिकाणी पाऊस झाला. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया, भंडारा, वर्धा, नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील काही भागांत पाऊस पडला.

पुढील चार ते पाच दिवस राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस उघडीप देण्याची शक्यता आहे. तर तूरळक ठिकाणी विजांसह पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. तर उद्या सकाळपर्यंत पूर्व विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. अमरावती, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया आणि भंडारा जिल्ह्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com