जेथे सुरू; तेथेही जोर ओसरला

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात मंगळवारी जोरदार सरींनी हजेरी लावली आहे. सिंधूदुर्ग, रायगड, जळगाव, पुणे, परभणी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला.
Rain Update
Rain UpdateAgrowon

पुणे : कोकण, मध्य महाराष्ट्र, घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी (Heavy Rainfall In Konkan) कोसळत असल्यातरी उर्वरित राज्यात पावसाचा जोर ओसरला () आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात (Rain In Catchment Area Of Dam) अद्यापही जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे. तर पावसाने दडी मारलेल्या भागात पेरण्या संकटात (Kharif Sowing In Danger) सापडल्या आहेत.

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात मंगळवारी जोरदार सरींनी हजेरी लावली आहे. सिंधूदुर्ग, रायगड, जळगाव, पुणे, परभणी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. तर घाटमाथ्यावरही पावसाचा काहीसा जोर दिसून आला. उर्वरित राज्यात मात्र ढगाळ हवामान, उन्हाचा चटका, हलक्या सरी असेच चित्र पाहायला मिळत आहे.

Rain Update
खते, बियाणे दुकानात 'कृषी'कडून तपासणी

बुधवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलीमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :

कोकण : कुडाळ ६०, रायगड, पेण प्रत्येकी ५०, दोडामार्ग, वसई, म्हसळा, कल्याण, माथेरान प्रत्येकी ४०, डहाणू, पालघर, विक्रमगड, सुधागड, मुलदे, मालवण, मेखेडा, मंडणगड, वेंगुर्ला प्रत्येकी ३०.

मध्य महाराष्ट्र : धरणगाव ५०, लोणावळा ४०, नगर, गगनबावडा, एरंडोल प्रत्येकी ३०, इगतपुरी, जेऊर, वडगाव मावळ, राधानगरी प्रत्येकी २०.

मराठवाडा : परभणी ४०, परांडा, भूम, खुलताबाद प्रत्येकी ३०, देवणी, पूर्णा प्रत्येकी २०.

घाटमाथा : कोयना (नवजा) ७०, अंबोणे ५०, लोणावळा ४०, डुंगुरवाडी, ताम्हिणी, भिरा, धारावी प्रत्येकी ३०.

राज्यातील पावसाची स्थिती--

- राज्यात ऊन, सावल्यांचा लपंडाव

- विदर्भात ढगाळ वातावरण, पावसाची उघडीप

- मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस.

- नाशिक जिल्ह्यात हलक्या सरी, जळगाव, धुळ्यात नाही

- सोलापूर जिल्ह्यात दडी कायम, कोल्हापुरात रणरणते ऊन

- सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजा, मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com