Weather Update : विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता

मॉन्सूनचा आस उत्तरेकडे सरकण्याचे संकेत असल्याने राज्यात सुरू असलेला पाऊस उघडीप देण्याची चिन्हे आहेत.
Weather Update
Weather UpdateAgrowon

पुणे : मॉन्सूनचा (Monsoon Axis) आस उत्तरेकडे सरकण्याचे संकेत असल्याने राज्यात सुरू असलेला पाऊस (Rain) उघडीप देण्याची चिन्हे आहेत. आज (ता. २६) विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता (Rain Forecast Including Lightning ) आहे. उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने (Weather Department) वर्तविला आहे.

नैॡत्य राजस्थान आणि परिसरावरील कमी दाबाचे क्षेत्र कच्छ आणि दक्षिण पाकिस्तान परिसरावर आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा या कमी दाब क्षेत्रापासून पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. मॉन्सूनचा आस आजपासून उत्तरेकडे जाण्याची शक्यता आहे. तर मध्य प्रदेश आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम असून, दक्षिण अंदमान समुद्रातही चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे.

Weather Update
Fertilizer : ब्रॅण्डेड कंपनीचे खत, तरी सिमला मिरची काही वाढेना

राज्यात सर्वदूर ढगाळ हवामान असून, तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहेत. आज (ता. २६) विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे. कोकणात पावसाच्या सरी सुरूच राहणार असून, उर्वरित राज्यात पाऊस ओसरून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.

Weather Update
Soybean Sowing : अकोला जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी अव्वल

विजांसह पावसाची शक्यता (येलो अलर्ट) :

बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.

उत्तर कोकणात जोरदार पाऊस

उत्तर कोकणात पाऊस वाढला असून, सोमवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये पालघर, रायगड, ठाणे जिल्ह्यांत अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडला. पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे ८१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे ८५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली.

राज्यात सोमवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :

कोकण :

पालघर : डहाणू ३९, जव्हार ८१, पालघर ६४, विक्रमगड ६७, वाडा ३९. रायगड : माथेरान ९५, पनवेल ३४, पोलादपूर ३९, रोहा ४०. रत्नागिरी : चिपळूण ७३, दापोली ३५, लांजा ३४. सिंधुदुर्ग : दोडामार्ग ३२. ठाणे : आंबरनाथ ३८, कल्याण ४७, मुरबाड ४३, शहापूर ५६, उल्हासनगर ४९.

मध्य महाराष्ट्र : जळगाव : यावल ५८. कोल्हापूर : राधानगरी ३२. नाशिक : इगतपुरी ८५, पेठ ३०, सुरगाणा ६०, त्र्यंबकेश्वर ५४. सातारा : महाबळेश्वर ३८.

मराठवाडा : औरंगाबाद : सिल्लोड ३४.

जालना : भोकरदन ३९, जाफ्राबाद ३३. नांदेड : बिलोली ३२.

विदर्भ : गडचिरोली : अहेरी ३७, भामरागड ४८, धानोरा ३८. नागपूर : नरखेडा ३०, पारशिवनी ४२, रामटेक ४४, सावनेर ३३.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
www.agrowon.com