Weather Update : विदर्भात विजांसह पावसाची शक्यता

कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्याकडील भागात पावसाची रिपरिप सुरूच आहे. पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाली आहे.
Weather Update
Weather Update

पुणे : कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्याकडील भागात पावसाची रिपरिप (Rainfall) सुरूच आहे. पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा चटका (Temperature) आणि उकाड्यात (Heat) वाढ झाली आहे. आज (ता. २६) विदर्भात विजांसह पावसाची शक्यता (Rain Forecast with Lightning) आहे. तर उर्वरित राज्यात मुख्यतः उघडिपीसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने (Weather Department) वर्तविला आहे.

Weather Update
Cotton : कपाशीवर घोंगावतेय गुलाबी बोंड अळीचे संकट

वायव्य राजस्थान आणि पाकिस्तान परिसरावर ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. त्याला लागूनच समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा ठळक कमी दाबाच्या क्षेत्रापासून राजस्थान, साजापूर, वाराणसी, गया, बंकूरा, दिगा ते उत्तर बंगालच्या उपसागरापर्यंत कायम आहे. वायव्य बंगालच्या उपसागरात समुद्र सपाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत.

राज्यात अंशतः ढगाळ हवामान असून, पावसाची उघडीप असल्याचे चित्र आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत. आज (ता. २६) विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात पावसाच्या उघडीपीसह हलक्या सरींची शक्यता आहे. कमाल तापमान आणि उकाड्यातही वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : बुलडाणा, अकोला, वर्धा, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com